शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

लाच घेताना पनवेल आरटीओतील कनिष्ठ लिपिक जाळ्यात; तिघांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 18:56 IST

Navi Mumbai: मेरीडाईन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ३२ ट्रेलर वाहनाचे स्पिड गव्हर्नर प्रमाणपत्र ऑनलाइन नोंदणी  करण्याकरिता ३२ हजाराची मागणी केल्याप्रकरणी  पनवेल आरटीओतील कनिष्ठ लिपीक संदीप संभाजी बासरे यांना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

- अरुणकुमार मेहत्रे कळंबोली - मेरीडाईन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ३२ ट्रेलर वाहनाचे स्पिड गव्हर्नर प्रमाणपत्र ऑनलाइन नोंदणी  करण्याकरिता ३२ हजाराची मागणी केल्याप्रकरणी  पनवेल आरटीओतील कनिष्ठ लिपीक संदीप संभाजी बासरे यांना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लाच ही समाजाला लागलेली एक कीड आहे. बक्कल पगार असतांनाही  शासकीय काम करून देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून लाच स्विकारली जात आहे. त्यात पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय अग्रेसर असल्याचे सोमवारी झालेल्या कारवाईत दिसून आले आहे. मेरीडाईन कंपनीच्या ३२ ट्रेलरचे स्पिड गव्हर्नर प्रमाणपत्र ऑनलाइन नोंदणी करण्याकरिता  प्रत्येकी १ हजार रुपये प्रमाणे ३२ गाड्यांचे  ३२ हजार रुपयाची मागणी आरटीओतील कनिष्ठ लिपीक संदिप बासरे यांनी केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्याकडे तक्रारदाराने रितसर तक्रार दाखल  केली होती.

त्या तक्रारीनुसार बासरे पैशाची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले.  एसीबीकडून सापळा लावण्याचे ठरले.  सोमवारी बासरे यांनी  संपूर्ण रक्कम न घेता १५  हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती १३ हजार रुपये  देण्याचे ठरले. सोमवारी एसीबीच्या अधिकारी यांनी पनवेल आरटीओ कार्यालयात सापळा लावला असता कनिष्ठ लिपीक संदीप संभाजी  बासरे ( वय ४५ वर्ष  ) यांनी रक्कम स्विकारताना रंगेहात पकडले. त्याचबरोबर यासाठी मदतनिस म्हणून खासगीत काम करणारे कल्पेश अनंत  कडू (वय ३१ वर्ष ) , कपिल वामन पाटील ( वय ४५ वर्ष ) या तिघांनाही एसीबीने ताब्यात घेतले. त्यानंतर कळंबोली पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाच प्रकरणी पनवेल आरटीओ चर्चेत लाच मागितल्या प्रकरणी वारंवार होणा-या कारवाईतून पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय चर्चेत आले आहे. २०२३ मध्ये कारवाई झाल्यानंतर लागलीच डिसेंबर २०२४ मध्ये सोमवारी कारवाई झाली आहे. आरटीओ कार्यालय स्थापन झाल्यापासून ही चौथी कारवाई झाली आहे. त्यात सहाय्यक आरटीओ अधिकारी, खासगी मदतनिस, खासगी एजेंट ,कनिष्ठ लिपीक यांचा समावेश आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणpanvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबई