शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई ते पंढरपूर अनोखी सायकल वारी; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 19:52 IST

आज संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय पायी दिंडीद्वारे पंढरपूरकडे कूच करत आहे . विठूच्या भेटीसाठी शेकडो किमीचा प्रवास करत वारकरी संप्रदाय अनेक वर्षांची परंपरा जोपासत आहे .

- वैभव गायकर

पनवेल : आज संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय पायी दिंडीद्वारे पंढरपूरकडे कूच करत आहे . विठूच्या भेटीसाठी शेकडो किमीचा प्रवास करत वारकरी संप्रदाय अनेक वर्षांची परंपरा जोपासत आहे . शुक्रवारी नवी मुंबईमधून देखील सायकलस्वार पर्यावरण बचावाचा संदेश  देत  सुमारे ३५० किमीचा प्रवास गाठण्यासाठी सज्ज झाले. खारघर मधून सहा जण पंढरपूर कडे रवाना झाले .            झाडे लावा पार्यावरण वाचवा हा संदेश दहा सायकल स्वार पंढरपूर कडे रवाना झाले असून या तरुणांमध्ये पोलीस, वकील तसेच डॉक्टर या उच्चशिक्षित अधिका-यांचा समावेश आहे . शुक्रवारी सकाळी सहा वाजता खारघर येथून सहा जणांचा पथक पंढरपूर कडे रवाना झाला . यामध्ये डॉ अमर भिडे , लाचलुचपत विभागातील कन्हैया थोरात , रवींद्र क्षीरसागर, बाळासाहेब सावंत, अंकुश बांगर, वाल्मिक पाटील, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे निलेश थोटे , पोलीस हवालदार गणेश पवार , अनिल गीते , मिलिंद सकपाळ आदींचा समावेश आहे . दहा जणांपैकी चार जण पुण्यात राहत असलयाने पुण्याहून या अनोख्या सायकल स्वारीत सहभागी होणार आहेत . मागील तीन वर्षपासून दहा जण या अनोख्या वारीचे आयोजन करत असतात . या प्रवासादरम्यान ग्रामस्थांमध्ये वृक्षलागवड , पर्यावरण संरक्षण , तसेच प्रकृती स्वास्थाचे धडे देणार आहेत . दोन दिवसात हा २५० किमीचा प्रवास हे दहा जण पार करणार आहेत . विशेष म्हणजे पंढरपूर ला स्थानापन्न झाल्यांनतर विठुरायाच्या चरणी पर्यावरण संरक्षणाची मागणी हे दहा जण करणार आहेत .       शासनाच्या विविध खात्यात काम करणारे उच्च पदस्थ अधिकारी , पोलीस अधिकारी , तसेच खाजगी क्षेत्रातील अधिकारी डॉक्टर यांचा व्यस्त कार्यकाळ सर्वानाच माहीत आहे . अशावेळी वेळात वेळ काढून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनोखी वारी करणा-या सर्वाचाच कौतुक केले जात आहे .

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई