शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई महापालिकेकडून कर्करोग तपासणी, महिलांसाठी विशेष शिबिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 03:13 IST

महिलांकडून नेहमीच स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे शहरातील महिलांना कर्करोगाच्या तपासण्या मोफत करता याव्यात तसेच आजाराचे वेळेत निदान व्हावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कॅन्सर तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

नवी मुंबई : महिलांकडून नेहमीच स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे शहरातील महिलांना कर्करोगाच्या तपासण्या मोफत करता याव्यात तसेच आजाराचे वेळेत निदान व्हावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कॅन्सर तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. याठिकाणी महागड्या तपासण्या मोफत होणार असल्याने शहरातील गोर-गरीब महिलांना दिलासा मिळणार असून सदर प्रस्तावाला स्थायी समिती सभेत मंजुरी मिळाली आहे.कर्करोग आजाराचे प्रमाण महिलांमध्ये वाढत असून विविध तपासण्या महाग असल्याने अनेकवेळा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मोफत तपासण्यांच्या माध्यमातून वेळेत उपचार व्हावेत, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शहरात कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरातील महिला, मुली महापालिका कर्मचारी, नगरसेविका आदींना शिबिराचा लाभ घेता येणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून २०१७ - १८ या आर्थिक वर्षात शहरात २५ ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ९७९ महिलांनी लाभ घेतला होता. यंदा आयोजन करण्यात आलेल्या शिबिरात ओरल आणि सरवायव्हल कर्करोग शिबीर आयोजित करण्यात आले असून विविध चाचण्या आणि उपचाराचा लाभ घेता येणार आहे. शिबिरातील चाचण्याबरोबर ब्रेस्ट कॅन्सरची देखील तपासणी व्हावी अशी मागणी या विषयावर स्थायी समिति सभेत झालेल्या चर्चेत लोकप्रतिनिधींनी केली.शहरात ११३ ठिकाणी कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या ११३ शिबिरांपैकी ६८ शिबिरे इंडियन कॅन्सर सोसायटीच्या माध्यमातून निशुल्क राबविण्यात येणार आहे.शिबिरासाठी सुमारे ३५ लाखांचा खर्चमहापालिकेला ४५ शिबिरांकरिता प्रति शिबीर ६७ हजार रु पये खर्च येणार आहे. यासाठी एकूण ३० लाख १५ हजार रु पये खर्च आकाराला जाणार आहे. त्यासोबत इतर खर्च मिळून महापालिकेला शिबिरांसाठी एकत्रित सुमारे ३५ लाख रु पये खर्च येणार आहे. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितिच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेला कर्करोग शिबिराच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या सभेत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका