शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

नवी मुंबई महापालिकेचा ४०२० कोटी रुपयांचा विक्रमी अर्थसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 00:26 IST

स्थायी समिती सभापतींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये तब्बल २१६ कोटी १९ लाख रुपयांची वाढ करून ४०२० कोटी रुपयांच्या विक्रमी अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.

नवी मुंबई : स्थायी समिती सभापतींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये तब्बल २१६ कोटी १९ लाख रुपयांची वाढ करून ४०२० कोटी रुपयांच्या विक्रमी अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. आयुक्तांच्या अंदाजापेक्षा ही रक्कम तब्बल ५६३ कोटी रुपयांनी जास्त आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान अनेक नगरसेवक उपस्थित नसल्यामुळे सभेचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी १६ फेब्रुवारीला ३४५५ कोटी ६४ लाख रुपये किमतीचा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये सादर केला होता. स्थायी समितीमध्ये दोन दिवस या विषयावर चर्चा केल्यानंतर त्यामध्ये १७३ कोटी रुपयांची वाढ केली होती. सभापती सुरेश कुलकर्णी यांनी ३६२९ कोटी ४४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक ५ मार्चला सर्वसाधारण सभेमध्ये सादर केले. सर्वसाधारण सभेमध्ये तीन दिवस या विषयावर चर्चा करण्यात आली. वास्तविक सर्व सदस्य अर्थसंकल्पावर चर्चा करतील असा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु प्रत्यक्षात चर्चा करण्यामध्ये बहुतांश सदस्यांना रस नसल्याचे दिसून आले. पहिल्या दिवशी फक्त दोन सदस्यांना त्यांचे मत मांडला आले होते. बुधवारी झालेल्या सभेमध्ये २० सदस्यांनी चर्चा केली होती. गुरुवारी शेवटच्या दिवशी फक्त ७ सदस्यांनी चर्चा केली. सभागृहामध्ये निवडून आलेले १११ व ५ स्वीकृत असे एकूण ११६ नगरसेवक आहेत. यापैकी सर्वसाधारण सभेत २९ व स्थायी समितीमध्ये १३ जणांनी चर्चेत सहभाग घेतला होता. उर्वरित सदस्यांनी एक शब्दही उच्चारला नाही.शेवटच्या दिवशी दुपारी २ वाजता सभेचे आयोजन केले होते, परंतु नगरसेवक वेळेत उपस्थित नसल्यामुळे तब्बल सव्वातास उशिराने सभा सुरू झाली. सभा सुरू असतानाही अनेक सदस्य वारंवार सभागृहाच्या बाहेर जात होते. सायंकाळी अर्थसंकल्प मंजूर करतानाही जवळपास ५१ जण सदस्य उपस्थित होते. शिवसेना व भाजपाचे सदस्य कमी प्रमाणात उपस्थित होते. नगरसेवकांच्या अनुपस्थितीमध्ये चर्चेतील अल्प सहभाग यामुळे सभेचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली होती. बहुतांश नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागामधील कामांविषयी सूचना केल्या. सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी सभागृहाच्यावतीने अंदाजपत्रकामध्ये वाढ सुचविली. महापौर जयवंत सुतार यांनी यावेळी सांगितले की, अर्थसंकल्पावर चर्चा करताना सदस्यांनी केलेल्या मौलिक सूचना आयुक्तांना सादर केल्या जातील. शहरातील विकासकामांची हीच गती कायम ठेवून नागरिकांना उत्तमोत्तम नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहर दुर्गंधीमुक्त करण्याच्या अनुषंगाने सदस्यांनी चर्चा केली असून भविष्यात समुद्राचे पाणी शहरात येऊ नये यासाठी झडपा असलेले नाले बनविणे गरजेचे आहे त्यासाठी शहरात नाला व्हिजन राबविणे महत्त्वाचे आहे. अर्थसंकल्प वास्तववादी असून कामांच्या गतीसाठी आयुक्तांनी अभियांत्रिकी विभाग सक्षम करावा असे स्पष्ट केले.>प्रशासनाची कसरतआयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजामध्ये तब्बल ५६३ कोटी रुपयांची वाढ अर्थसंकल्पामध्ये केली आहे. वाढीव उद्दिष्ट साध्य करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.>उत्पन्नासाठी सुचविलेली वाढ (खर्च कोटीमध्ये)विभाग स्थायीचे महासभेची अंतिमअंदाज वाढ उद्दिष्टरस्ते खोदाई शुल्क ३५ १० ४५मालमत्ता कर ६८५ १३९ ८२४नगररचना १९० १० २००स्थानिक संस्था कर ११८६ २५ १२११पाणीपुरवठा ९२ १५ १०७बाह्य रुग्ण शुल्क २ २ ४लोककला केंद्र अनुदान २३ ५ २८मोरबे धरण १८ १० २८>खर्चाची तरतूदकामाचे नाव तरतूदसंगणकीकरण ९.९०सीसीटीव्ही ७०पाणी निचरा सुधारणा ७५उड्डाणपूल बांधणे ७५अडथळामुक्त रस्ते पदपथ ३७६उद्याने २३.२५शाळा वर्गखोली बांधणे ५६.७२मंडई खुले गाळे बांधणे ३३.७६नवीन जलवाहिन्यांची कामे २७.१०नवीन जलकुंभ व उदंचन केंद्र २४.२९दवाखाने बांधणे २७.१६व्यायाामशाळा व विविध भवन ५५.२०मैदाने विकसित करणे २३.६१तलावांची सुधारणा १०.३६गावठाण मलनि:सारण योजना २०.५९नवीन पूल बांधणे ३३.३२स्मशानभूमी बांधणे १५.१४दिवाबत्ती सुधारणा १५.७५विद्युतवाहक तारा भूमिगत १०.८१परिवहन उपक्रम अनुदान १४०कंत्राटी कामगार वेतन थकबाकी ७०