शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

स्वच्छताविषयक प्रोत्साहनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची स्पर्धा, सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 00:10 IST

Navi Mumbai Municipal Corporation News : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता मनपाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. वारंवार हात धुणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे अशा आरोग्य सुरक्षाविषयक नियमांचे पालन करण्यासाठी  नागरिकांचे विविध माध्यमांतून प्रबोधन करण्यात येत आहे.

नवी मुंबई - महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण, २०२१ करिता देशात सर्वप्रथम क्रमांक मिळविण्याचा संकल्प केला आहे. या अभियानात लोकसहभाग वाढविण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. सोसायटी, हाॅटेल, शाळा, हाॅस्पिटल व मार्केट या गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.   कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता मनपाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. वारंवार हात धुणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे अशा आरोग्य सुरक्षाविषयक नियमांचे पालन करण्यासाठी  नागरिकांचे विविध माध्यमांतून प्रबोधन करण्यात येत आहे. त्याच बरोबरीने स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन, स्वच्छतेविषयी व्यापक स्वरूपात माहिती, शिक्षण, प्रसार व जनजागृती करण्यात येत आहे. रहिवाशांना कचरा वर्गीकरण व त्यावरील प्रक्रिया, तसेच इतर स्वच्छताविषयक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहित करणे, तसेच या उपक्रमांमध्ये सातत्य ठेवून नागरिकांच्या स्वच्छताविषयक सवयींमध्ये बदल घडविण्याच्या दृष्टीने सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. स्पर्धेमध्ये प्रामुख्याने कचरा वर्गीकरण, कचऱ्यावर कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करणे, शौचालय व्यवस्था, स्वच्छताविषयक पायाभूत सुविधा आणि कोरोना आजाराचा प्रसार रोखण्याकरिता करण्यात आलेल्या उपाययोजना व नियमांचे पालन, असे विविध निकष गुणांकनाकरिता असणार आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी २६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत संबंधित विभाग कार्यालयात अर्ज दाखल करावयाचा आहे. या स्पर्धेचे प्रत्यक्ष स्थळ परीक्षण व गुणांकन दि. २ ते २० नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे.स्पर्धेमध्ये विभाग स्तरावरून निवड करण्यात आलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय स्वच्छ गृहनिर्माण संस्थांना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार व ११ हजार रुपये अशी रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह वितरित केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे, महापालिका स्तरावरील विजेत्या प्रथम, द्वितीय व तृतीय स्वच्छ गृहनिर्माण संस्थांना अनुक्रमे ५१ हजार, ४१ हजार व ३१ हजार रोख बक्षिसे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र यांच्यासह प्रदान केली जाणार आहेत. स्वच्छ  शाळा स्पर्धेच्या खासगी व नमुंमपा दोन्ही गटांतील प्रथम व द्वितीय विजेत्या शाळांना अनुक्रमे १५ हजार व ११  हजार रोख बक्षिस, तसेच स्वच्छ शाळा स्पर्धेच्या खासगी व नमुंमपा दोन्ही गटांतील प्रथम व द्वितीय विजेत्या शाळांना अनुक्रमे २५ हजार व २१ हजार रोख बक्षिस हे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह प्रदान करण्यात येणार आहे. मार्केट स्पर्धेकरिता प्रथम व द्वितीय क्रमांक विजेत्या मार्केटना अनुक्रमे २५ हजार व २१ हजार रोख बक्षिस, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह प्रदान करण्यात येणार आहे.  

लोकसहभागातून नवी मुंबई शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहावी, हा नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न असून, निकोप स्पर्धेतून नागरिकांना प्रेरणा मिळावी, याकरिता आयोजित स्वच्छता स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ व ‘स्वच्छ नवी मुंबई मिशन’ यशस्वीपणे राबविण्यात प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने आपला सक्रिय सहभाग नोंदवावा.    - अभिजीत बांगर,     महापालिका आयुक्त  

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या