शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

सिडकोच्या पंतप्रधान आवास योजनेस महापालिकेचा सुरुंग; भूखंडावर दाखविले ट्रक टर्मिनलचे आरक्षण

By नारायण जाधव | Updated: August 27, 2022 19:55 IST

महापालिकेने विकास आराखड्यात या भूखंडावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १२०० ट्रकसाठी टर्मिनल विकसित केल्याचे नमूद केले आहे.

नवी मुंबई : आपल्या बहुचर्चित प्रारूप विकास आराखड्यात नवी मुंबई महापालिकेने वाशी सेक्टर १९ येथील भूखंड क्र. १ या ६५ हजार २६४ चौरस मीटरच्या भूखंडावर ट्रक टर्मिनलचे आरक्षण दाखविले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याच भूखंडावर सिडकोकडून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांचे काम सुरू आहे. मात्र, आता महापालिकेने त्यावर आरक्षण टाकल्याने सिडकोचा हा प्रकल्प अडचणीत येण्याची भीती व्यक्त होत आहे.

महापालिकेने विकास आराखड्यात या भूखंडावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १२०० ट्रकसाठी टर्मिनल विकसित केल्याचे नमूद केले आहे. त्याचबरोबर आणखी पाच हजार ट्रक पार्किंगसाठी नव्याने ट्रक टर्मिनल विकसित करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.परंतु, सध्या या भूखंडावर सिडकोने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत तीन हजार १५१ घरे बांधण्याचे काम यापूर्वीच हाती घेतले असून, त्याबाबत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने २०२० मध्येच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनीही जनहित याचिका दाखल केली असून, नवी मुंबई महानगरपालिका त्यामध्ये प्रतिवादी आहे. असे असताना महापालिकेने त्यावर आरक्षण टाकले आहे.

मात्र, ते टाकताना त्यावरील घरांचे बांधकाम थांबविण्याबाबत सिडकोसोबत कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. परंतु, आता आरक्षणाच्या वादामुळे सिडकोचा कोट्यवधी रुपयांचा पंतप्रधान आवास योजनेतील प्रकल्प गोत्यात आला आहे. भविष्यात सिडको विरुद्ध महापालिका सामना रंगण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईत ट्रक टर्मिनलची अत्यंत गरजनवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच बाजारपेठांमध्ये देशभरातून मोठ्या प्रमाणात कृषी माल येतो. शिवाय येथील टीटीसी औद्योगिक वसाहतीत साडेतीन हजारांहून अधिक कारखान्यांतही औद्योगिक मालाची ने-आण सुरू असते. यातून शहरांत दररोज सहा ते सात हजार अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, आता एकमेव ट्रक टर्मिनलवर सिडकोने घरांचे बांधकाम सुरू केल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली असून, ते शहरांत वाट्टेल तिथे आपली वाहने उभी करीत आहेत. यातून कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.