शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई महापालिकेने थकविले २२९ कोटींचे पाणीबिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 02:17 IST

- नामदेव मोरे नवी मुंबई : स्वत:च्या मालकीचे धरण असूनही महानगरपालिका एमआयडीसीकडून पाणी विकत घेत आहे. १९९२ पासून पाणीबिलाच्या ...

- नामदेव मोरेनवी मुंबई : स्वत:च्या मालकीचे धरण असूनही महानगरपालिका एमआयडीसीकडून पाणी विकत घेत आहे. १९९२ पासून पाणीबिलाच्या थकबाकीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. तब्बल २२९ कोटी २६ लाख रुपये थकबाकी आहे. थकीत रक्कम पालिकेकडून वसूल करावी, अन्यथा नळजोडणी खंडित करण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.एमआयडीसीमधील झोपडपट्टी परिसराला अद्याप मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जात नाही. एमआयडीसीकडून पाणी विकत घेतले जात आहे. पर्यायी व्यवस्था असावी म्हणून एमआयडीसीकडून पाणी विकत घेतले जात असल्याचे कारण पालिकेकडून देण्यात येते. एमआयडीसीकडून ३३ ठिकाणी मुख्य नळजोडणी घेण्यात आल्या आहेत. यासाठी प्रत्येक महिन्याला सव्वादोन ते अडीच कोटी रुपये बिल भरावे लागते. आॅगस्ट महिन्यामध्ये पालिकेला दोन कोटी ३७ लाख ६५ हजार रुपये बिल एमआयडीसीने पाठविले आहे. पालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याचे आलेले बिल भरले जात आहे; परंतु यापूर्वीची थकीत रक्कम भरली जात नाही. १९९२ पासून थकबाकीचे भिजते घोंगडे कायम आहे. महापालिकेकडे आतापर्यंत तब्बल २२९ कोटी २६ लाख ७८ हजार रुपये थकबाकी असल्याची माहिती एमआयडीसी प्रशासनाने दिली आहे.महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, महापालिका एमआयडीसीचे प्रत्येक महिन्याचे पाणीबिल भरत आहे. जुन्या थकबाकीचा व त्यावरील दंड व व्याजाचा प्रश्न प्रलंबित आहे. तो निकाली काढण्यासाठी वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असल्याचेही सांगण्यात आले; परंतु याविषयी अधिकृतपणे कोणीही माहिती दिलेली नाही. शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, याविषयी वस्तुस्थिती काय आहे याविषयी माहिती घेऊन सोमवारी तपशील देऊ, अशी माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते अमोल नाईक यांनी याविषयी एमआयडीसीला पत्र देऊन थकबाकी वसूल करावी. पैसे भरले नाहीत तर संबंधितांची नळजोडणी खंडित करावी, अशी मागणी केली आहे. याविषयी उचित कारवाई झाली नाही तर शासनस्तरावरही तक्रार केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.वर्षानुवर्षे प्रश्न प्रलंबितमहापालिकेची स्थापना झाल्यानंतर एमआयडीमधील झोपडपट्टी परिसराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे आली. झोपडपट्टीची संख्या वाढल्यानंतर त्यांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारीही महापालिकेवर आली आहे. सद्यस्थितीमध्ये दिघा ते बेलापूरपर्यंत झोपडपट्टीमध्ये पालिकेच्या वतीने पाणीपुरवठा केला जात आहे. एमआयडीसीकडून पाणी विकत घेऊन झोपडपट्टीवासीयांना पुरविले जात आहे. थकबाकीचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित असून त्यावर अद्याप कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नाही.सामान्य नागरिकांनी पाणी किंवा इतर कर थकविले की महापालिका तत्काळ संंबंधितांवर कारवाई करते; परंतु पालिकेने स्वत:च जवळपास २२९ कोटी रुपये थकविले असल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले आहे. ही थकबाकी एमआयडीसीने वसूल करावी, यासाठी आम्ही पत्र दिले आहे. थकबाकी न भरल्यास कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.- अमोल नाईक,सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका