शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई : गुन्हा मागे घेण्यासाठी अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य

By सूर्यकांत वाघमारे | Updated: August 25, 2022 17:38 IST

एका तरुणाने ओळखीचा गैरफायदा घेत तिच्यासोबत दुष्कृत्य करून व्हिडीओ बनवला होता.

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने सदरचा गुन्हा मागे घेण्यासाठी वडिलांवर दबाव टाकण्याकिरता पुन्हा तिच्यासोबत दुष्कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरुणाविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कामोठे परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीसोबत हा प्रकार घडला आहे. एका तरुणाने ओळखीचा गैरफायदा घेत तिच्यासोबत दुष्कृत्य करून व्हिडीओ बनवला होता. याबाबत पीडित मुलीने वडिलांना कळवल्यानंतर २०२० मध्ये त्याला पॉक्सोच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. मोहम्मद समिम मुस्तकीम उर्फ राजू असे त्याचे नाव आहे. या गुन्ह्यात तो काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटला असता त्याने पुन्हा पीडित मुलीला त्रास देण्यास सुरवात केली. यावेळी तो वडिलांना सांगून त्याच्यावर दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. तसेच पूर्वीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला तिच्याच मित्रासोबत गैरकृत्य करण्यास भाग पाडून त्याचाही बनवला होता.

मात्र इशारा देऊनही आपल्यावरील गुन्हा मागे न घेतल्याने अखेर बुधवारी त्याने पीडित अल्पवयीन मुलीचा तिच्या मित्रासोबतच्या दुष्कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. पीडित मुलीला त्याबाबत मित्रांकडून समजताच याबाबत तिने घरी सांगितल्यानंतर पुन्हा त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, त्याने इतरही मुलींसोबत अशी कृत्ये केली आहेत का? याची चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी