शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

नवी मुंबई मेट्रो उद्यापासून धावणार, लोकहितासाठी सिडकोने उद्घाटनाचा सोपस्कार टाळला

By कमलाकर कांबळे | Updated: November 16, 2023 20:16 IST

दीर्घकाळ रखडलेला बेलापूर ते पेंधर हा मेट्रोचा पहिला टप्पा गेल्या वर्षभरापासून प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज आहे.

नवी मुंबई : मंत्र्यांच्या तारखांअभावी मागील वर्षभरापासून रखडलेला नवी मुंबईमेट्रोचा प्रवास शुक्रवारपासून प्रत्यक्षात उतरत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार उद्घाटनाची औपचारिकता न करता बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रोचा पहिला टप्पा शुक्रवारपासून प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी घेतला.

दीर्घकाळ रखडलेला बेलापूर ते पेंधर हा मेट्रोचा पहिला टप्पा गेल्या वर्षभरापासून प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज आहे. या मार्गावर एकूण ११ स्थानकांसह तळोजा पांचनंद येथे आगार (डेपो) आहेत. मेट्रोचे संचालन करण्यासाठी सिडकोने महामेट्रोची नियुक्ती केली आहे. त्यानुसार मेट्रोचा पहिला टप्पा प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्याची सर्व तयारी महामेट्रोने पूर्ण केली आहे. परंतु, केवळ उद्घाटनाच्या सोपस्कारासाठी हा प्रवास रखडला आहे.

गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन करण्याची योजना सिडकोने आखली होती. मात्र, पंतप्रधानांचा नियोजित नवी मुंबई दौरा रद्द झाल्याने हा मुहूर्त टळला. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. त्याच वेळी मेट्रो सेवा सुरू करावी, या मागणीसाठी विविध राजकीय पक्षांनी सिडकोच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. यात नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटनाची औपचारिकता न करता मेट्रो मार्ग क्रमांक १ वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश सिडकोला दिले. त्यानुसार १७ नोव्हेंबरपासून नवी मुंबईतील पहिल्या मेट्रो सेवेचा शुभारंभ होत आहे.

दुपारी ३ वाजता धावणार पहिली मेट्रोबेलापूर ते पेंधर दरम्यान दोन्ही स्थानकांतून दुपारी ३ वाजता पहिली मेट्रो धावणार आहे. तर शेवटची मेट्रो रात्री १० वाजता असेल. १८ नोव्हेंबरपासून पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यान सकाळी ६ वाजता पहिली मेट्रो धावणार असून दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री १० वाजता होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक १५ मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे.

१० ते ४० रुपये असेल तिकीट दरमेट्रोच्या तिकिटाचे दर हे अंतरानुसार निश्चित केले आहेत. त्यानुसार ० ते २ किमीच्या टप्प्यासाठी १० रुपये. तर २ ते ४ किमी अंतरासाठी १५ रुपये तिकीट दर असणार आहेत. ४ ते ६ किमी अंतरासाठी २० रुपये, ६ ते ८ किमीसाठी २५ रुपये तिकीट दर निश्चित केले आहेत. ८ ते १० किमी अंतरासाठी ३० रुपये आणि १० किमीपुढील अंतरासाठी ४० रुपये प्रवास भाडे आकारले जाणार आहे.

नवी मुंबई मेट्रो मार्गावरील ११ स्थानकेसीबीडी-बेलापूर, सेक्टर ७, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक, खारघर सेक्टर ११, खारघर, सेक्टर १४, खारघर सेंट्रल पार्क, पेठपाडा, खारघर सेक्टर ३४, पाचनंद आणि पेंधर-तळोजा ही ११ स्थानके या मार्गावर आहेत.

बेलापूर ते पेणधर दरम्यान मेट्रो सेवा सुरू होत असून नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न साकार होत आहे. मेट्रोच्या रूपाने नवी मुंबईकरांना जलद, पर्यावरणपूरक आणि आरामदायी परिवहनाचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. सीबीडी बेलापूरसह वेगाने विकसित होत असलेल्या खारघर, तळोजा नोड्सना मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभणार आहे.- अनिल डिग्गीकर, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

टॅग्स :Metroमेट्रोNavi Mumbaiनवी मुंबई