शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

'इंडियन स्वच्छता लीग'मध्ये नवी मुंबई युवक सहभागात देशात नंबर वन

By नामदेव मोरे | Updated: September 30, 2022 19:35 IST

नवी मुंबई : 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत केंद्र सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ अंतर्गत ...

नवी मुंबई: 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत केंद्र सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग’ मध्ये ‘युथ वर्सेस गार्बेज’ या टॅगलाईननुसार 53 हजाराहून अधिक युवकांच्या सहभागाने सीबीडी, बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात महापालिका आयुक्त   अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार भव्यतम उपक्रम राबविण्यात आला. त्याचप्रमाणे लीग अंतर्गत एक लाखाहून अधिक नवी मुंबईकर नागरिकांनी 'नवी मुंबई इको नाईट्स' संघात नोंदणी केली. तरुणाईच्या या उत्स्फुर्त सहभागाबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेस केंद्र सरकारच्या वतीने इंडियन स्वच्छता लीगमध्ये राष्ट्रीय स्तरावर 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरामध्ये सर्वोत्तम युवक सहभागाचा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार लाभला.

नवी दिल्ली येथील तालकोटरा स्टेडियममध्ये संपन्न झालेल्या स्वच्छ अमृत महोत्सवच्या भव्य समारंभात केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास राज्यमंत्री  कौशल किशोर यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर सहसचिव तथा स्वच्छ भारत मिशनच्या संचालक   रूपा मिश्रा, नगर विकास विभाग उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव  अमृत अभिजीत आणि प्रधान सचिव निकुंज श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत अभियानाचे नमुंमपा नोडल अधिकारी डाॅ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता संजय देसाई, परिमंडळ उपायुक्त   दादासाहेब चाबुकस्वार व डाॅ. अमरिश पटनिगीरे यांनी हा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या या भव्यतम उपक्रमाची विक्रमी नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ मध्ये झाली असून इंडियन स्वच्छता लीगसाठी सुप्रसिध्द संगीतकार, गायक व नवी मुंबईकर रहिवाशी पद्मश्री   शंकर महादेवन यांच्या नेतृत्वाखाली ‘नवी मुंबई इको क्नाईट्स’ हा संघ जाहीर करण्यात आला होता. त्या अंतर्गत एक लाखाहून अधिक नागरिकांनी रजिस्ट्रेशन करीत सहभाग नोंदविला. इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत पामबीच मार्गावर महापालिका मुख्यालय इमारत ते मोराज सर्कल सानपाडा पर्यंत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा झळकवत मानवी साखळीच्या माध्यमातून स्वच्छता संदेश प्रसारित करण्यात आला. त्यासही बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्सचा बहुमान लाभला. त्याचप्रमाणे यावेळी कांदळवन स्वच्छता मोहीम राबवून तेथून जमा करण्यात आलेला कचरा ६० फूट फ्लेमिंगो रेखाकृतीच्या आत जमा करून पर्यावरणशील दृष्टीकोन जपत फ्लेमिंगो सिटी ही नवी मुंबईची ओळख अधोरेखीत करण्यात आली.

अशाचप्रकारे सेक्टर 10 ए, मिनी सी शोअर, वाशी याठिकाणी 207 तृतीयपंथी नागरिकांनी ‘स्वच्छता कार्यात आमचाही सहभाग’ असा संदेश प्रसारित करत परिसर स्वच्छता केली व जनजागृती रॅली काढली. याचीही विशेष दखल बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स यांनी घेतली. त्याचप्रमाणे पारसिक हिल, सीबीडी, बेलापूर येथे युवकांनी एकत्र येत ओला, सुका व घरगुती घातक कच-याच्या वर्गीकरणाचे महत्व निळ्या, हिरव्या व काळ्या रंगाच्या छत्र्या प्रदर्शित करून आगळ्यावेगळ्या प्रकारे प्रदर्शित केले तसेच परिसराची स्वच्छताही केली. स्वच्छतेमध्ये नेहमीच देशामध्ये आघाडीवर असणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेला इंडियन स्वच्छता लीगमध्येही सर्वाधिक युवक सहभागाचा १० लाख लोकसंख्येवरील देशातील मोठ्या शहरात प्रथम क्रमांकाच्या शहराचा राष्ट्रीय बहुमान लाभला असून हा नवी मुंबईतील युवाशक्तीचा सन्मान आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई