शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

पामबीच रोडनजीक सारसोळे खाडीकिनारी वृक्षतोड; मद्यपींसह गर्दुल्यांचा अड्डा

By नामदेव मोरे | Updated: April 18, 2024 18:13 IST

डेब्रीज माफियांकडूनही अतिक्रमण सुरू : प्रशासनाचे दुर्लक्ष

नवी मुंबई : शहरात अनधिकृत वृक्षतोडीच्या घटना वाढू लागल्या आहेत. पामबीच रोडवर सारसोळे खाडीकिनारी असलेल्या भुखंडावरील वृक्षही तोडले जात आहेत. या परिसरामध्ये मद्यपींसह, गर्दुल्यांचे अड्डे तयार झाले आहेत. डेब्रीज माफियाही मोकळ्या जागेत भराव करू लागले आहेत. पर्यावरणाची हानी होत असून याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.

पामबीच रोडवरील टी एस चाणक्य येथे खारफुटीच्या वृक्षाची कत्तल केल्याची घटना ताजी असताना शहरात इतर ठिकाणीही वृक्षतोडीच्या घटना समोर येवू लागल्या आहेत. महामार्गावरील नेरूळ एलपी पुलाजवळील पदपथाच्या जवळील वृक्षांचीही कत्तल करण्यात आली आहे. आता पुन्हा पामबीच रोडवरील सारसोळे जेट्टीजवळील सिडकोच्या प्रस्तावीत मैदानाच्या भूखंडावरील व खाडीकिनाऱ्यावरील वृक्षांची कत्तल केली जात आहे. पामबीच रोड व वनविभागाच्या हद्दीच्या मध्ये असलेल्या विस्तीर्ण भूखंडावर मोठ्या प्रमाणात वृक्ष संपदा आहे. या परिसरात काही पर्यावरण प्रेमी नागरिकांनी आंबा व इतर वृक्षांचीही लागवड केली असून त्यांची नियमीत काळजी घेतली जात आहे. परंतु मागील काही दिवसामध्ये येथे काही वृक्ष तोडल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. या ठिकाणी वृक्षांच्या फांद्यांचा ढिग रचण्यात आला आहे. खाडीकिनारी काही वृक्ष तोडल्याच्या खुणाही दिसत आहेत.

या परिसरामध्ये मद्यपी व गर्दुल्यांचा अड्डा तयार झाला आहे. रात्री येथे मद्यपींच्या पार्ट्या सुरू असतात. परिसरात सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसत आहे. गांजा व इतर अमली पदार्थ सेवन करण्यासाठी लागणारे कागदही पहावयास मिळत आहेत. मोकळ्या भूखंडावर डेब्रीजही टाकले जात आहे. पामबीच रोडवर महत्वाच्या परिसराच्या सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना केली जात नसल्यामुळे पर्यावरण प्रेमी नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. वृक्ष तोडीविषयी माहिती घेण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सदर जागा सिडकोच्या अखत्यारीत असल्याची माहिती देण्यात आली.

खारफुटीलाही धोकासद्यस्थितीमध्ये अद्याप प्रत्यक्षात खारफुटी तोडल्याचे दिसत नाही. परंतु खारफुटीला लागून असलेले काही वृक्ष तोडल्याच्या खुणा दिसत आहेत. यामुळे भविष्यात खारफुटीही तोडली जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी व्यक्त केली नाराजीया परिसरातील वृक्षतोडीच्या घटनांविषयी पामबीच रोडनजीकच्या इमारतीमधील नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. काही दक्ष नागरिकांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडेही तक्रारी केल्या असून पर्यावरणाचा ऱ्हास व असामाजीक तत्वांचा वापर थांबविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण ढेबे यांनी  केली आहे.