शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: पळस्पेमधून ६ लाख ८८ हजाराचा गांजा जप्त, दोघांना अटक

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 8, 2024 18:26 IST

Navi Mumbai: अमली पदार्थ विरोधी पथकाने पळस्पे येथे सापळा रचून दोघांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ६ लाख ८८ हजार रुपये किमतीचा ३४ किलो ४०० ग्रॅम गांजा मिळून आला आहे. याप्रकरणी नवीन पनवेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

-  सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई - अमली पदार्थ विरोधी पथकाने पळस्पे येथे सापळा रचून दोघांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ६ लाख ८८ हजार रुपये किमतीचा ३४ किलो ४०० ग्रॅम गांजा मिळून आला आहे. याप्रकरणी नवीन पनवेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पळस्पे परिसरात दोघेजण गांजाच्या व्यवहारासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांनी सहायक निरीक्षक निलेश धुमाळ, उपनिरीक्षक कुलदीप मोरे, उत्तम लोखंडे, विजय पाटील, संजय फुलकर आदींचे पथक केले होते. या पथकाने गुरुवारी रात्री पळस्पे परिसरात सापळा रचला होता. त्यामध्ये संशयित वर्णनाची कार अडवून कारमधील दोघांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांच्यावर संशय आल्याने कारची झडती घेतली असता, कारमध्ये दोन बॅगमध्ये भरून ठेवलेला ३४ किलो ४०० ग्रॅम गांजा आढळून आला. बाजारभावानुसार त्याची किंमत ६ लाख ८८ हजार रुपये आहे. याप्रकरणी दोघांवर नवीन पनवेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडील कार देखील जप्त करण्यात आली आहे. तर या दोघांच्या माध्यमातून पुढील सूत्रधारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न अमली पदार्थ विरोधी पथक करत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबईDrugsअमली पदार्थ