शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई: चार गावांनी केले विमानतळाचे काम बंद: मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कामाला विरोधच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:43 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता सुरू असलेला भराव त्याचबरोबर टेकडी उत्खननाचे काम गुरुवारी चार गावातील ग्रामस्थांनी बंद पाडले आहे.

अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता सुरू असलेला भराव त्याचबरोबर टेकडी उत्खननाचे काम गुरुवारी चार गावातील ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. ठेकेदारांना गुलाबपुष्प आणि सिडको अधिकाºयांना निवेदन देवून शांततेच्या मार्गाने प्रकल्पबाधितांनी आंदोलन केले.जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत कामे सुरू करू न देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. विमानतळामुळे बाधित होणाºया दहा गावांतील ग्रामस्थांना सिडकोकडून वेगवेगळी आश्वासने देण्यात आली होती. वारंवार झालेल्या बैठकीत बहुतांशी गोष्टी मान्य करण्यात आल्या होत्या. त्यांची पूर्तता झाल्यानंतरच विमानतळाचे काम हाती घेण्याचे ठरले होते. संबंधित गावांचे पुनर्वसन न करतात आजूबाजूच्या जागेवर भराव टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. त्याचबरोबर उलवे टेकडी फोडण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले होते. याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना पूर्वकल्पना देण्यात आली नाही त्यामुळे तरघर, कोंबडभुजे, ओवळे, गणेशपुरी येथील ग्रामस्थांनी एकत्र येवून हे कामे बंद पाडण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार गुरुवारी उलवे येथील मंदिरात मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त जमले. पुनर्वसनाबाबत सिडको उदासीन दिसून येत आहे. त्याचबरोबर विमानतळाचे काम मात्र वेगाने केले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. यावेळी माजी आमदार विवेक पाटील यांनी आमचा प्रकल्पाला विरोध नाही, परंतु जी आश्वासने सिडकोने दिले आहेत त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. जोपर्यंत येथील ग्रामस्थांचे समाधान होत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही विवेक पाटील यांनी दिली. राजेंद्र पाटील यांनी ठेकेदार नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. तुम्ही ठेकेदार नेमताना आधी प्रकल्पग्रस्तांचा विचार करा, अशा शब्दात त्यांनी संबंधित नेत्यांना सुनावले.

टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबई