शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पर्यटकांसाठी ‘नवी मुंबई दर्शन’ बस सुरू होणार; राजन विचारे यांच्या मागणीला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 01:01 IST

नवी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे नवी मुंबई येथील पर्यटन स्थळांना उत्तम दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मुंबईच्या धर्तीवर ‘नवी मुंबई दर्शन’ बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. 

नवी मुंबई :  नवी मुंबई शहराचा विकास झपाट्याने होत असून अनेक विकासकामे पूर्णत्वास येत आहेत. शहरातील नयनरम्य पर्यटन स्थळाचा लाभ घेण्यासाठी पर्यटक आकर्षित होतात. परंतु, पर्यटकांना पर्यटनस्थळे पाहण्यासाठी खाजगी वाहनांतून प्रवास करावा लागतो. परिणामी प्रवासासाठी त्यांना जादाचे पैसे मोजावे लागतात. त्यामुळे पर्यटकांच्या सोयी सुविधेसाठी खासदार राजन विचारे यांनी नवी मुंबई येथील पर्यटन स्थळांना उत्तम दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मुंबईमध्ये ज्याप्रमाणे रविवारी बस चालविली जाते त्याप्रमाणे ‘नवी मुंबई दर्शन’ बस सेवा सुरु करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती. या मागणीला यश आले असून महापालिकेने याबाबतीत सकारात्मकता दाखविली आहे.

नवी मुंबई शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो रेल्वे, रो-रो सेवा अशी एक ना अनेक विकासकामे पूर्णत्वास येत आहेत. शहराला लाभलेल्या खाडी किनाऱ्यामुळे ऐरोली येथील बायो डायव्हर्सिटी पार्कही विकसित होत आहे. याच पार्श्वभूमीवर विदेशी पक्षी येथे नेहमीच स्थलांतर करत असतात. त्यांच्या स्थलांतरामुळे येथील निसर्ग सौंदर्याला नवी उभारी मिळते. घणसोली येथील गवळीदेव सुलाईदेवी या पर्यटन स्थळांचा विकास वेगाने होत आहे. 

त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेकडून महापालिका क्षेत्रात तब्बल ३५० अद्ययावत उद्यान विकसित केले आहेत. तसेच येथील नव्याने होऊ घातलेल्या ज्वेलपार्कचे काम सुरु आहे. तर, पामबीचला लागून १६ किमी लांबीचा सायकल ट्रॅकही उभारण्यात येणार आहे. शहरातील अशी पर्यटन स्थळे पाहण्यासाठी खाजगी वाहनांतून प्रवास करावा लागतो. परिणामी प्रवासासाठी त्यांना जादाचे पैसे मोजावे लागतात. त्यामुळे पर्यटकांच्या सोयी सुविधेसाठी विचारे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे नवी मुंबई येथील पर्यटन स्थळांना उत्तम दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मुंबईच्या धर्तीवर ‘नवी मुंबई दर्शन’ बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. 

विचारे यांनी केलेल्या मागणीची नवी मुंबई महापालिकेने तातडीने दखल घेत नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी ‘मुंबई दर्शन’ डबलडेकर बस सेवेप्रमाणेच ‘नवी मुंबई दर्शना’ साठी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी बस सेवा सुरू करण्यासाठी परिवहन उपक्रमाद्वारे पाहणी व नियोजन करून बस सेवा लवकरच सुरु केली जाणार असल्याचे कळविले आहे.

नवी मुंबई शहरात विविध सार्वजनिक सेवांचे पर्यटकांना आकर्षण व्हावे, यासाठी लवकरच ही बस सेवा सुरु झाल्यास शहरातील आणि शहराबाहेरील पर्यटकांना याचा लाभ मिळणार आहे तसेच यामुळे महापालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.  -राजन विचारे(खासदार)

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई