शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: एपीएमसीतले हमाल निघाले गुन्हेगार, घरफोडीतुन चोरलेले १७ लाखांचे मोबाईल, तिघांना अटक

By सूर्यकांत वाघमारे | Updated: August 1, 2024 20:06 IST

Navi Mumbai Crime News: तुर्भे जनता मार्केट येथील घरफोडी प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून १७ लाख रुपये किमतीचे मोबाईल व इतर साहित्य हस्तगत केले आहे. अटक केलेल्या तिघांपैकी दोघे एपीएमसी आवारात हमालीचे काम करणारे असून एकजण चालकाची नोकरी करायचा.

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई - तुर्भे जनता मार्केट येथील घरफोडी प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून १७ लाख रुपये किमतीचे मोबाईल व इतर साहित्य हस्तगत केले आहे. अटक केलेल्या तिघांपैकी दोघे एपीएमसी आवारात हमालीचे काम करणारे असून एकजण चालकाची नोकरी करायचा.

तुर्भे जनता मार्केट येथील मोबाईल दुकानाचे शटर तोडून घरफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यांच्या अनुशंघाने गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाकडून तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरु होता. त्यासाठी वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांनी सहायक निरीक्षक सतीश भोसले, उपनिरीक्षक राहुल भदाणे, हवालदार संजय राणे, सचिन टिके आदींची पथके केली होती. त्यामध्ये संशयित व्यक्तींची माहिती मिळवून त्यांचा शोध सुरु होता. यादरम्यान तुर्भे गावातच एक व्यक्ती मिळून आल्याने त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यावरून त्याच्या इतर दोन साथीदारांना देखील अटक करण्यात आली. सेलराज नाडर (५५), नरेशकुमार वर्मा (२७) व अनिकेत यादव (१९) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण १७ लाख १९ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सहायक आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्यासह तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नाडर व वर्मा दोघेही एपीएमसी मार्केटमध्ये हमालीचे काम करायचे. तर रात्री जागा मिळेल त्याठिकाणी मुक्काम करायचे. तर यादव हा चालकाची नोकरी करणारा असून तो तुर्भे गावात भाड्याच्या घरात रहायला आहे. त्याच्याच घरात चोरीचा मुद्देमाल त्यांनी लपवला होता. त्यात १०१ मोबाईल, २६ इअर बर्ड व १० इतर उपकरणांचा समावेश होता. हे मोबाइलफोन ते विक्री करण्यासाठी ते खरेदीदाराच्या शोधात होते. त्यासाठी त्यांनी बांग्लादेश मध्ये देखील मध्यस्थींमार्फत प्रयत्न केला होता असेही समजते. मात्र तत्पूर्वीच त्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडील चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी