शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

नवी मुंबई राज्यातील सर्वांत स्वच्छ शहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 01:28 IST

शहरवासीयांनी स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले व सर्वांच्या सहभागामुळे नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

नामदेव मोरेनवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबईने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. ४ हजार शहरांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत देशात तिसरा क्रमांक मिळविला. राज्यातील सर्वांत स्वच्छ शहर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. शहरवासीयांनी स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले व सर्वांच्या सहभागामुळे नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईची देशात ओळख आहे. देश व राज्य पातळीवरील बहुतांश सर्व महत्त्वाचे पुरस्कार महानगरपालिकेने मिळविलेले आहेत. चोवीस तास पाणीपुरवठा, अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, घनकचरा व्यवस्थापनाची सर्वोत्तम व्यवस्था, अत्याधुनिक पद्धतीने बनविलेली क्षेपणभूमी, शिक्षण व इतर सर्वच विभागांसाठी मनपाने पुरस्कार मिळविले असून, या सर्वांमध्ये स्वच्छता अभियानातील कामगिरी महत्त्वाची आहे.राज्य शासनाने २००२ मध्ये संत गाडगे महाराज नागरी स्वच्छता अभियान सुरू केले व पहिल्याच वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेने प्रथम क्रमांक मिळविला. २००५ मध्ये पुन्हा या स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक मिळविला. केंद्र शासनाने स्वच्छता अभियान सुरू केल्यानंतर नवी मुंबईने पहिल्या प्रयत्नामध्ये आठव्या क्रमांकावर झेप घेतली. गतवर्षी महानगरपालिकेने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली व घनकचरा व्यवस्थापनात प्रथम क्रमांक मिळविला होता. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये देशातील पहिल्या तीन शहरांमध्ये समावेश व्हावा असा निर्धार करून महानगरपालिकेने स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले होते. सर्व शहरवासीयांना या चळवळीमध्ये सहभागी करून घेतल्यामुळेच महानगरपालिकेने देशात सातव्या क्रमांकावरून तिसºया क्रमांकावर झेप घेतली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता अभियानामध्ये मिळविलेले यश हे फक्त एक वर्षातील कामाचे फलित नाही. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून प्रत्येक वर्षी स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. कोपरखैरणेमधील डम्पिंग ग्राउंड बंद करून तेथे निसर्ग उद्यान बनविले आहे. अशा प्रकारे कचरा डेपोमध्ये बनविलेले हे देशातील सर्वांत भव्य उद्यान आहे. तुर्भेमध्ये अत्याधुनिक पद्धतीने नवीन डम्पिंग ग्राउंड तयार केले आहे. ओला व सुका कचºयाचे वर्गीकरण करण्यामध्येही विशेष लक्ष दिले आहे. महानगरपालिकेच्या शाळा, उद्याने सर्वच ठिकाणी कचºयातून खतनिर्मिती करण्यात येत आहे. स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबईकरांचा सहभाग प्रत्येक वर्षी वाढत गेला. लोकसहभाग व नागरिकांमधील स्वच्छतेविषयी जागृती यामुळेच नवी मुंबई महानगरपालिकेने देशपातळीवर स्वतंत्र ठसा उमटविला आहे.>महानगरपालिकेस मिळालेले पुरस्कारकेंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने देशातील राहण्यायोग्य शहरामध्ये देशात दुसºया क्रमांकाचे मानांकन दिले.स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये देशात सातवा व राज्यातपहिला क्रमांक२०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कारस्वच्छ सर्वेक्षण २०१७ मध्ये राज्यात पहिला व देशातआठवा क्रमांक२०११ मध्ये जलवितरण व्यवस्थेसाठी राष्ट्रीय नागरी जलपुरस्कार२००८ - ०९ मध्ये सर्वोत्तम स्वच्छता सुविधांसाठी संत गाडगे महाराज नागरी स्वच्छता अभियानांतर्गत विशेष पुरस्कार२००९ - सांडपाणी व स्वच्छताविषयी सुविधांसाठी सर्वोत्कृष्ट शहर पुरस्कार२००९ - शहरी भागातील गरिबांसाठीच्या सुविधांसाठी राष्ट्रीय नागरी जलपुरस्कारदेऊन सन्मानितकेंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत दोन वेळा राज्यातील प्रथम क्रमांकसंत गाडगे महाराज स्वच्छता अभियानामध्ये २००२ व २००५ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक