शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

सिडकोची घरे सामान्यांच्या आवाक्याबाहेर, किंमत २५ लाखांपासून ९७ लाखांपर्यंत

By कमलाकर कांबळे | Updated: January 8, 2025 16:18 IST

CIDCO Home Update: ऑनलाइन अर्ज नोंदणीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना सिडकोने विविध नोडमधील गृहप्रकल्पनिहाय २६ हजार घरांच्या किमती मंगळवारी रात्री जाहीर केल्या. त्या नोडनिहाय २५ लाखांपासून ९७ लाखांपर्यंत आहेत.

- कमलाकर कांबळे नवी मुंबई - ऑनलाइन अर्ज नोंदणीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना सिडकोने विविध नोडमधील गृहप्रकल्पनिहाय २६ हजार घरांच्या किमती मंगळवारी रात्री जाहीर केल्या. त्या नोडनिहाय २५ लाखांपासून ९७ लाखांपर्यंत आहेत. त्यामुळे वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत असलेल्या ग्राहकांचा उशिरा का होईना संभ्रम दूर झाला आहे. मात्र, असे असले तरी सिडकोने जाहीर केलेल्या घरांच्या किमती अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचा सूर ग्राहकांत उमटला आहे.

गेल्या वर्षी ११ ऑक्टोबर रोजी सिडकोने माझे पसंतीचे सिडको घर या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता २६ हजार घरांची योजना जाहीर केली होती. यात तळोजा, खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, कळंबोळी, पनवेल आणि वाशी येथील गृहप्रकल्पांतील घरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या योजनेतील घराच्या नोंदणीसाठी तब्बल तीन वेळा मुदतवाढ दिली. १० जानेवारीपर्यंत ती आहे. मात्र, या संपूर्ण कालावधीत घरांच्या किमती जाहीर केल्या नव्हत्या. त्यामुळे बजेटमधील घरांच्या शोधात असलेल्या ग्राहकांची कोंडी झाली होती. नेमके कोणत्या प्रकल्पातील घरासाठी अर्ज करावा, याबाबत अनेक ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे सिडको घरांच्या किमती कधी जाहीर करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. त्यानुसार अर्ज नोंदणीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना सिडकोने घरांच्या किमती जाहीर केल्याने शेवटच्या टप्प्यात अर्ज नोंदणी करताना ग्राहकांची तारांबळ उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे अर्ज नोंदणीसाठी आणखी काही मुदतवाढ मिळावी, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

तळोजातील घरे स्वस्त२६ हजार घरांपैकी सर्वाधिक घरे तळोजा नोडमध्ये आहेत. विविध कारणांमुळे ग्राहकांनी नाकारलेल्या घरांचा या योजनेत समावेश आहे. त्यामुळे ही घरे विकण्याचे मोठे आवाहन सिडकोसमोर उभे ठाकले आहे. त्यावर उपाय म्हणून या विभागातील घरांच्या किमती २५ लाखांपासून ४६ लाखांपर्यंत ठेवल्या आहेत. सर्वांत कमी दर तळोजा सेक्टर २८ येथील घरांचे असून येथे २५ लाखांपर्यंत घर उपलब्ध केले आहे.

खारघरमधील घरे सर्वांत महागसिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या खारघर नोडमध्ये तीन ठिकाणच्या घरांचा या योजनेत समावेश केला आहे. यापैकी सेक्टर २ ए येथील घरांच्या किमती सर्वाधिक म्हणजेच ९७ लाख इतक्या आहेत. त्यापाठोपाठ वाशीतील ट्रक टर्मिनलच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या घराची किंमत ७४ लाख इतकी आहे. प्रकल्पनिहाय घरांच्या किमती (ईडब्ल्यूएस आणि एलआयजी)

-तळोजा सेक्टर २८ - २५,१ लाख- तळोजा सेक्टर ३९ - २६.१ लाख

-तळोजा सेक्टर ३७ - ३४.२ लाख-तळोजा सेक्टर ३७- ४६.४ लाख-खारघर रेल्वे स्टेशन सेक्टर २ए - ९७.२ लाख

-खारघर बस डेपो- ४८.३ लाख-खारकोपर २ ए - ३८.६ लाख

-खारकोपर २ बी- ३८.६ लाख-खारकोपर ईस्ट - ४०.३ लाख

-कळंबोली बस डेपो - ४१.९ लाख-पनवेल बस टर्मिनल- ४५.१ लाख

-मानसरोवर रेल्वे स्टेशन - ४१.९ लाख- खान्देशवर रेल्वे स्टेशन -४६.७ लाख

-बामणडोंगरी - ३१.९ लाख-वाशी ट्रक टर्मिनल - ७४.१ लाख

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबईHomeसुंदर गृहनियोजन