शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल तस्करीतील बोटीला आग; गुन्हे शाखेने समुद्रात केली होती कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 08:58 IST

दोन महिन्यांपासून सीबीडीतील पुलाखाली दोन्ही बोट उभ्या होत्या

नवी मुंबई : समुद्रात डिझेल तस्करीप्रकरणी कारवाई केलेल्या बोटींना आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. त्यामध्ये एक बोट पूर्णपणे जळाली असून, दुसरी बोट अर्धवट जळाली आहे. दोन महिन्यांपासून सीबीडीतील पुलाखाली या दोन्ही बोट उभ्या होत्या. मोठ-मोठ्या जहाजांमधून काळ्या बाजाराने डिझेल मिळवून त्याची कमी दराने विक्री करून डिझेल तस्करी रॅकेट चालविणाऱ्यांवर गुन्हे शाखा पोलिसांनी १२ जानेवारीला कारवाई केली होती. या कारवाईत डिझेल तस्करीसाठी विशेष बनविलेल्या दोन बोट व त्यामधील सुमारे २१ हजार लिटर डिझेल जप्त केले होते. समुद्रात चालणाऱ्या डिझेल तस्करीच्या रॅकेटपैकी एकेक रॅकेट होते. त्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी त्यांच्या पथकासह समुद्रात सापळा रचून ही कारवाई केली होती. दोन्ही बोटी सीबीडी येथील जेट्टीलगत पुलाखाली उभ्या होत्या. त्यापैकी एका बोटीला बुधवारी आग लागली.  काही वेळातच  दुसऱ्या बोटीलाही आग लागली. अग्निशमन दलाने दोन तासात आग विझवली.आगीबाबत साशंकताया गुन्ह्यात अटक केलेले सर्वजण सध्या जामिनावर मुक्त आहेत. या बोटी सुमारे १५ ते २० लाख रुपये किमतीच्या असून, त्या मात्र पोलिसांच्याच ताब्यात होत्या. अचानक लागलेल्या या आगीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या दुर्घटनेची नोंद एनआरआय पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.अगोदरच वर्तवली होती धोक्याची शक्यताडिझेल साठा असलेल्या या बोटी पुलाखाली उभ्या न करण्यासंदर्भात जानेवारी महिन्यातच विशेष शाखा उपायुक्त रुपाली अंबुरे यांनी पत्राद्वारे कळवले होते. ज्या ठिकाणी या दोन्ही बोट उभ्या करण्यात आल्या होत्या, त्याच ठिकाणी सागरी सुरक्षा पोलिसांची चौकी आहे. शिवाय खाडी पूलदेखील असल्याने डिझेलमुळे दुर्घटना घडल्यास मोठ्या नुकसानाची शक्यता त्यांनी वर्तवली होती.