शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई झाली कर्जमुक्त, उत्पन्नवाढीला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 10:12 IST

४,९२५ कोटींच्या अर्थसंकल्पात सर्वांगीण विकासावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ चा ४,९२५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी  सादर केला. सर्वांगीण विकासावर भर देताना वास्तववादी योजनांना प्राधान्य दिले आहे. यंदाही शहरवासीयांवर कोणतीही करवाढ लादलेली नाही. महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असून पूर्णपणे कर्जमुक्त झाल्याचे आयुक्तांनी सांगितले. 

उड्डाणपूल, स्मार्ट पार्किंग, आरोग्यसुविधा, स्वच्छता अभियानासह शहर सुरक्षेलाही प्राधान्य दिले आहे. महानगरपालिकेच्या विशेष सभागृहात राजेश नार्वेकर यांनी पुढील वर्षभरातील जमा-खर्चाचा ताळेबंद सादर केला. यात १,१४५ कोटी रुपयांची आरंभीची शिल्लक आहे. स्वच्छता अभियानावर मनपाने देशपातळीवर ठसा उमटविला असून यावर्षी देशात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी अर्थसंकल्पातही शहर स्वच्छतेला विशेष प्राधान्य दिले आहे. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, सुशोभीकरण यावर भर दिला आहे. ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, नेरूळ येथे नवीन उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येणार आहे.

स्मार्ट व बहुमजली पार्किंग,  वैद्यकीय महाविद्यालय होणारn नवी मुंबईमध्ये स्मार्ट व बहुमजली पार्किंगची योजना राबविली जाणार आहे. पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय या शैक्षणिक वर्षापासून प्रत्यक्षात सुरू केले जाणार आहे. n आरोग्य यंत्रणा बळकट केली जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात डबल डेकर बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  शहरात १५०० सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून मोरबे धरणावर सौरऊर्जा प्रकल्प राबविला जाणार आहे.

नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासास प्राधान्य देताना वास्तववादी अर्थसंकल्प सादर केला आहे. महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असून कोणतेही कर्ज नाही. यामुळे यावर्षीही कोणतीच करवाढ केलेली नाही. सर्वोत्तम पायाभूत सुविधांसह पर्यावरण रक्षण, आरोग्य व शहर सुरक्षेलाही प्राधान्य दिले आहे.- राजेश नार्वेकर, आयुक्त महानगरपालिका. 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2023Navi Mumbaiनवी मुंबई