शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हीआयपी’पणाची सुखद अनुभूती अन्... तंत्रज्ञान, खाद्यसंस्कृती आणि जागतिक सुविधांचा संगम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 09:28 IST

एकदम ‘स्मार्ट’ आणि आल्हाददायक पंचतारांकित अनुभव...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : बुधवारी देशाला लोकार्पण होणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ प्रवासाचे केंद्र ठरणार नाही, तर तंत्रज्ञान, खाद्यसंस्कृती आणि जागतिक सुविधांचा संगम ठरणार आहे. मुंबईच्या वाढत्या हवाई वाहतुकीला दिलासा देण्याबरोबरच देश-विदेशातील प्रवाशांना ‘स्मार्ट’ आणि आल्हाददायक तसेच एकंदर पंचतारांकित अनुभव मिळणार आहे.  

फाइव्ह-जी कनेक्टिव्हिटी, डिजियात्रामार्फत संपर्कमुक्त प्रवास, मानवरहित ओळख तपासणी, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सामानाचे थेट ट्रॅकिंग  या सोयी विमानतळाच्या प्रवेशद्वारापासूनच प्रवाशांना जाणवतील. आयओटी आणि स्मार्ट व्यवस्थापनामुळे टर्नअराउंड वेळेत बचत होईल, तर भक्कम सायबर सुरक्षेमुळे विमानतळ खऱ्या अर्थाने अत्याधुनिक ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. 

फक्त तंत्रज्ञानच नव्हे, तर चविष्ट खाद्यपदार्थ आणि खरेदीसाठीही भरगच्च पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. आर्टिसनल टी, लोकप्रिय मुंबई ब्रँड्स, आंतरराष्ट्रीय दर्जाचा फूड हॉल, शेफ-क्युरेटेड डायनिंग आणि ब्रुअरी-बार्स प्रवाशांचा प्रवासच नव्हे, तर ‘खाद्यप्रवास’ही संस्मरणीय करतील. त्याशिवाय  सांस्कृतिक वारशाला मान देणारा डिजिटल आर्ट प्रोग्रॅम, किड्स झोन, ५०० प्रवाशांसाठी आलिशान लाउंजेस, ट्रांझिट होस्टेल्स, स्वागताची ‘प्रणाम सेवा’ आणि घरपोच सामान सेवा आदींमुळे या विमानतळाला वेगळाच दर्जा लाभणार आहे. 

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे हाेणार दर्शनप्रवाशांचे स्वागत करणारे डिजिटल आर्ट इन्स्टॉलेशन्स हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. सात गोलाकार एलईडी  स्क्रीन्स, दोन इंटरॲक्टिव्ह डिस्प्ले व सिक्युरिटी चेकनंतर उभारण्यात येणारे जगातील सर्वांत मोठ्या इन्स्टॉलेशन्सपैकी एक असे प्रदर्शन थक्क करणार आहे. त्याशिवाय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या  फायब्रिक फोरेस्ट आणि सिक्युरिटी चेकनंतर तणाव कमी करण्यासाठी खास तयार केलेले इमर्शिव्ह डिजिटल एक्सप्रियन्स  या कलाकृती वेगळेपण सिद्ध करतात.

पहिल्या टर्मिनलची रचना करताना चार मोठी प्रवेशद्वारे देण्यात येणार आहेत, तर प्रवाशांच्या व्यवस्थापनासाठी अल्फा, ब्रावो आणि चार्ली अशी तीन प्रमुख केंद्र उभारली जाणार आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbai Airport: VIP Experience, Tech, Food, and Global Amenities

Web Summary : Navi Mumbai International Airport offers a seamless blend of technology, culinary delights, and global amenities. Expect 5G connectivity, digital travel, diverse food options, cultural exhibits, and premium services for a delightful, world-class experience. It's more than just travel.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ