शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळ सेवेसाठी सज्ज; या तारखेपासून उड्डाणे सुरु करण्याचा विचार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 08:47 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून विमानतळाचा विकास केला जात आहे. या प्रकल्पावर नोडल एजन्सी म्हणून सिडको काम करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई :  देशातील पहिले ग्रीन फिल्ड आतंरराष्ट्रीय विमानतळनवी मुंबईत उभारले जात आहे. सध्या विमानतळाचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यानुसार १७ एप्रिल रोजी विमानतळ व्यावसायिक वापरासाठी खुले करण्याची योजना आहे. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी विमानतळ प्रकल्पाला भेट देत आढावा घेतला. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून विमानतळाचा विकास केला जात आहे. या प्रकल्पावर नोडल एजन्सी म्हणून सिडको काम करत आहेत. गेल्या वर्षभरात आवश्यक असलेल्या अनेक चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. 

१७ एप्रिलपासून विमानतळ खुले करण्याची योजना विमानाचे टेक ऑफ आणि लॅण्डिंगचीही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यानुसार १७ एप्रिलपासून नवी मुंबई विमानतळ व्यावसायिक वापरासाठी खुले करण्याची योजना आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष विपिन कुमार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे संचालक फैज अहमद किडवई यांनी  संबंधित अधिकाऱ्यांसोबत विमानतळाच्या कामांचा  दिवसभर आढावा घेतला. यावेळी नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळाचे प्रादेशिक संचालक  प्रकाश निकम, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक  विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक  शांतनू गोयल आदी उपस्थित होते.

व्यापक मूल्यमापननागरी विमान वाहतूक महासंचालनालय ही देशातील प्रमुख विमानतळ सुरक्षा नियामक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून  विमानतळाचे व्यापक मूल्यमापन करण्यात आले.  विमानतळाच्या धावपट्टी, एप्रन, टॅक्सी वे, एटीसी टॉवर टर्मिनल बिल्डिंग, बॅगेज हॅंडलिंग सिस्टीम आदी सुविधांचा यावेळी आढावा घेण्यात आला. 

निर्णायक टप्पाआढावा घेण्यासाठी आलेल्यांसाठी मॉक चेक-इन प्रक्रिया राबविण्यात आली. या अंतर्गत डमी बोर्डिंग पास आणि बॅगेज टॅग जारी करण्यात आले. त्यानंतर संयुक्त बैठकीत काही सुधारणा सूचित करण्यात आल्या. विमानतळ परिचालनाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा आणि तितकाच निर्णायक टप्पा होता.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ