शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

नवी मुंबई विमानतळाचे ६३ टक्के काम पूर्ण, सिडकोचा दावा: पुढच्या वर्षी विमानतळाचे टेकऑफ

By कमलाकर कांबळे | Updated: March 25, 2024 20:18 IST

Navi Mumbai Airport Update: देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. ३१ मार्च २०२५ मध्ये या विमानतळावरून विमानाचे पहिले टेकऑफ होईल, असा विश्वास संबंधित विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार कामाने वेग घेतला असून आतापर्यंत ६३ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा सिडकोने केला आहे.

- कमलाकर कांबळे नवी मुंबई - देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळनवी मुंबईत उभारले जात आहे. ३१ मार्च २०२५ मध्ये या विमानतळावरून विमानाचे पहिले टेकऑफ होईल, असा विश्वास संबंधित विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार कामाने वेग घेतला असून आतापर्यंत ६३ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा सिडकोने केला आहे. तसेच यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत विमानांच्या उड्डाणाची चाचणी घेणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयएपीए) अदानी समूहाद्वारे रायगड जिल्ह्यातील पनवेलनजीकच्या १६०० हेक्टर जागेवर हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात आहे. यात सिडको ही नोडल एजन्सी म्हणून काम पाहत आहे. या प्रकल्पासाठी १९ हजार ६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. दरम्यान, सध्या पहिल्या दोन टप्प्याच्या कामावर भर दिला जात आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल हे यासाठी आग्रही आहेत. त्यामुळेच व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारताच सर्वप्रथम त्यांनी विमानतळ प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. निर्धारित कालावधीत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार एक धापवट्टी आणि टर्मिनल उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. एकूणच प्रकल्पाच्या कामाची गती पाहता यावेळी तरी विमानतळाची डेडलाइन हुकणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पाच टप्प्यात प्रकल्प पूर्णहा ग्रीनफिल्ड प्रकल्प पाच टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. यातील पहिल्या दोन टप्प्यात वर्षाला दोन कोटी प्रवासी क्षमता असणार आहे. पहिल्या टप्प्याचे ६३ टक्के काम पूर्ण झाल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. प्रकल्पाचे पाच टप्पे पूर्ण झाल्यावर विमानतळाला चार टर्मिनल आणि दोन धावपट्टी असतील. तसेच विमानतळावर उत्तम दर्जाची रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जल कनेक्टिव्हिटीचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ