शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नवरात्रीसाठी नवरंगी बाजारपेठा

By admin | Updated: September 30, 2016 04:06 IST

नवरात्रीला अवघे तीन दिवस उरले असताना खरेदीला उधाण आले असून शहरातील बाजारपेठा नवरंगांनी सजल्या आहेत. नवरात्रीतील चालणाऱ्या दांडिया रास, गरबा नृत्य

- प्राची सोनवणे,  नवी मुंबई नवरात्रीला अवघे तीन दिवस उरले असताना खरेदीला उधाण आले असून शहरातील बाजारपेठा नवरंगांनी सजल्या आहेत. नवरात्रीतील चालणाऱ्या दांडिया रास, गरबा नृत्य यासाठी जिकडेतिकडे दागिन्यांचा लखलखाट पहायला मिळतो आहे. नक्षीकाम केलेले दागिन्यांचे विविध पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.दागिन्यांशिवाय पोशाखाला सौंदर्य येत नाही म्हणूनच बाजारात अगदी डोक्यावरच्या बिंदीपासून ते पायातील पैंजणांपर्यंत विविध दागिने उपलब्ध आहेत. कच्छी, राबेरी, काच, काचेचे मणी, मेटल, आॅक्साईड, कापड, लाकूड असे विविध प्रकारच्या दागिन्यांना वाढती मागणी आहे. गरब्यासाठी मेटलच्या, आॅक्साईड, तांब्या-पितळेचे दागिन्यांचे आणि काळ्या धाग्यापासून बनविलेले आकर्षक नेकलेस ८० रु पयांपासून १००० रु पयांपर्यंत उपलब्ध आहेत. हातातले राजस्थानी कडे, घागऱ्यावर बांधण्यासाठी कंबरपट्टा आदी आभूषणे पारंपरिकतेत आणखी भर टाकतात. नऊ रंगांमध्येही ज्वेलरीचा आकर्षक सेट उपलब्ध असून आॅनलाइन खरेदीचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. बिंदी : दागिन्यांची सुरुवात बिंदीपासून होते. भांगामध्ये तीन साखळ्या व कपाळावर रु ळणारे लोलक अशा साध्या दागिन्यांपासून भांगाच्या दोन्ही बाजूला असलेले घुंगरू, मोठे लोलक अशा विविध प्रकारांत बिंदी सजल्या आहेत. झुमके : सध्या जिकडेतिकडे झुमक्यांची क्रे झ आहे. आकर्षक रंगीबेरंगी मोती लावलेल्या झुमक्यांना तरुणींची वाढती मागणी आहे. हे झुमके घागरा-चोलीवर विशेष उठून दिसतात. गोंड्याच्या बांगड्या : राजस्थानी टच असलेल्या बांगड्यांना शोभेल असे रंगीत गोंडे लावल्यावर या बांगड्या तयार होतात. यात लाखेच्या बांगड्यांची विशेष क्र ेझ आहे. कच्छी दागिने : कवडी आणि वेगवेगळ्या कच्छी एम्ब्रॉयडरीने कापडावर केलेल्या दागिन्यांना कच्छी दागिने म्हणतात. कमरबंध, बाजूबंद, मांगटिका, मंगल हार अशा पद्धतीतले हे दागिने सध्या खूप लोकप्रिय आहेत. मेहंदीसोबत हातफुल खुलते. स्टोन नेकपीस, काचेच्या बांगड्यांनी हटके लूक देता येईल. ज्वेलरीचा आकार, रंग साजेसा असावा. मेटल, आॅक्साईडच्या दागिन्यांनी आकर्षक लूक येतो. -माधुरी शेळके, फॅशन डिझाईनर