शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गणेश नाईकांच्या दरबारावर शिंदेसेनेचा 'खासदार भेटी'चा उतारा; वाशीतील उपक्रमास प्रतिसाद

By नामदेव मोरे | Updated: February 27, 2025 19:36 IST

बोनकोडेतील ग्रामस्थांनीही मांडल्या समस्या

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: वनमंत्री गणेश नाईक यांनी सुरू केलेल्या जनता दरबारानंतर शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईत खासदार आपल्या भेटीला उपक्रम सुरू केला आहे. वाशीतील पहिल्याच उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. सिडको, महानगरपालिका, एमआयडीसीविषयी समस्या नागरिकांनी मांडल्या. गणेश नाईक यांच्या बोनकोडे गावातील नागरिकांनीही तेथील समस्या सोडविण्यासाठी निवेदन सादर केले.

वाशी येथील संपर्क कार्यालयामध्ये खासदार आपल्या भेटीला उपक्रम राबविण्यात आला. यावेळे शिंदे सेनेचे बेलापूर जिल्हा प्रमुख किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्यात याव्यात. सिडकोतील घरांच्या हस्तांतरणाविषयीच्या समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली. करावे परिसरातील नागरिकांनी जुन्या चाळींवर व घरांवरही कारवाई केली जात असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. वनमंत्री गणेश नाईक यांच्या बोनकोडे गावातील नागरिकांनीही तेथील समस्या सोडविण्याची मागणी केली. गावातील मैदानाचा प्रश्न सोडविण्यात यावा. रस्ते व इतर समस्या सोडविण्यात याव्यात. बावखळेश्वर मंदिरासाठी जागा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

नागरिकांनी मांडलेले प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. वनमंत्र्यांच्या जनता दरबाराला पर्याय म्हणून हा उपक्रम सुरू केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना नियमीत भेटता यावे यासाठी खासदार आपल्या भेटीला उपक्रम राबविला जात असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले. यावेळी शिंदे सेनेचे माजी नगरसेवक शिवराम पाटील, रमाकांत म्हात्रे, अनिकेत म्हात्रे, सरोज पाटील, शितल कचरे, राजू पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आम्ही दरबारी राजकारण करणारे नाही आहोत. रस्त्यावर उतरून जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य असते. यामुळे दरबार नाही तर खासदार आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केला आहे.- नरेश म्हस्के, खासदार ठाणे

खासदार आपल्या भेटीला उपक्रमात बोनकोडे गावासह शहरातील सर्व विभागातील नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या. यामध्ये सिडको, पोलीस, महानगरपालिका, एमआयडीसीशी संबंधीत प्रश्न होते.- किशोर पाटकर, जिल्हा प्रमुख बेलापूर

टॅग्स :naresh mhaskeनरेश म्हस्केGanesh Naikगणेश नाईक