शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये शासकीय वास्तूंना ऐतिहासिक किल्ल्यांची नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 02:23 IST

आयुक्तांचा निर्णय : संकल्पना राबविणारी पहिलीच महापालिका; ‘स्वराज्य’ नावाने ओळखले जाणार पालिका मुख्यालय

वैभव गायकर

पनवेल : पनवेल महापालिकेच्या विविध वास्तूंना ऐतिहासिक नावे देण्याचा निर्णय आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतला आहे. अशा प्रकारची संकल्पना राबवणारी पनवेल महानगरपालिका ही राज्यातील पाहिलीच महानगरपालिका ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांच्या बंगल्यांना विविध नावाने ओळखले जाते. त्याच धर्तीवर पनवेल महापालिकेचे मुख्यालय, आयुक्त निवास, महापौर निवास तसेच प्रभाग कार्यालये भविष्यात ओळखली जाणार आहेत.

रायगड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व असून, पनवेल महापालिका जिल्ह्यातील पहिली आणि एकमेव महापालिका आहे. ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने पालिकेच्या महत्त्वाच्या वास्तूंना ऐतिहासिक नावे देण्याची संकल्पना आयुक्त गणेश देशमुख यांनी राबविली आहे. यापूर्वी कृषी विद्यापीठामार्फत अशी अनेखी संकल्पना राबविण्यात आली असून, कृषी विद्यापीठांतर्गत उभारण्यात आलेल्या वसतिगृहांना ऋतूंची नावे देण्यात आली आहेत. याच धर्तीवर पनवेल महापालिकेच्या वास्तूंची ऐतिहासिक किल्ल्यांची नावे देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.पनवेल महापालिकेच्या मुख्यालयाला ‘स्वराज्य’ नाव देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात रायगडला स्वराज्याच्या राजधानीचे स्थान देण्यात आले होते. त्याच धर्तीवर पनवेल महापालिकेचे मुख्यालय हे स्वराज्य मुख्यालय म्हणून भविष्यात ओळखले जाणार आहे. याच प्रकारे महापौर बंगल्याला ‘शिवनेरी’ तर आयुक्त बंगल्याला ‘राजगड’ हे नाव देण्यात आले आहे. पालिकेचे प्रभागनिहाय कामकाज ज्या प्रभाग कार्यालयातून चालते, त्या पालिकेच्या अ, ब, क, ड या चार प्रभाग कार्यालयांना विजयदुर्ग, जलदुर्ग, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग आदी नावे देण्यात आली आहेत.रायगड जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता भावी पिढीला आपला अमूल्य इतिहास लक्षात राहावा, या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे.रायगड जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पनवेल शहर हा रायगड जिल्ह्याचा अविभाज्य घटक आहे. हे लक्षात घेता ही संकल्पना राबविण्यात आली आहे. कृषी विद्यापीठाने त्यांच्या वसतिगृहांना ऋतूची नावे दिली आहेत. त्याच आधारावर पनवेल महानगरपालिकेच्या वास्तूंना किल्ल्यांची नावे देण्याची संकल्पना राबविली आहे.- गणेश देशमुख,आयुक्त, पनवेल महानगरपालिकापनवेल महापालिकेची संकल्पना खरोखरच स्तुत्य आहे. भावी पिढीला गड, किल्ले यांचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. पालिकेच्या वास्तूंना अशाप्रकारे ऐतिहासिक नावे दिल्यास भावी पिढी इतिहासाबद्दल नक्कीच विचार करेल.- चेतन डाऊर,इतिहास संशोधक, पनवेलमहानगरपालिकेच्या वास्तूंना ऐतिहासिक किल्ल्यांची नावे देण्याची संकल्पना अतिशय स्तुत्य आहे. या विषयावर अभ्यास करण्यासाठी आम्ही वेळ घेतला आहे, तोपर्यंत विषय स्थगित ठेवला असला तरी पुढील सभेत या विषयाला मंजुरी देण्यात येईल.- परेश ठाकूर,सभागृह नेते, पनवेल महानगरपालिका

टॅग्स :panvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबईFortगड