शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू दाखल्यावरून वारसाचे नाव गायब, नवी मुंबई महापालिकेचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 00:24 IST

कोविडच्या प्रादुर्भावामुळे सर्वच यंत्रणा कोलमडल्या आहेत. विशेषत: आरोग्य विभागाची तारेवरची कसरत सुरू आहे. महापालिकेच्या बहुतांशी विभागाचा कारभार ठप्प आहे. कोविडमुळे धास्तावलेल्या संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अक्षम्य चुका होत आहेत.

नवी मुंबई : मृतदेहांची अदलाबदल, जीवंत माणसाला मृत्यू घोषित करणे अशा प्रकारानंतर महापालिकेच्या संबंधित विभागाने आता मृत्यू दाखल्यावरून वारसदारांची नावेच गायब केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात विचारणा करायला गेलेल्या नातेवाइकांना संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरेसुद्धा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.कोविडच्या प्रादुर्भावामुळे सर्वच यंत्रणा कोलमडल्या आहेत. विशेषत: आरोग्य विभागाची तारेवरची कसरत सुरू आहे. महापालिकेच्या बहुतांशी विभागाचा कारभार ठप्प आहे. केवळ आरोग्य आणि त्याच्याशी संबंधित विभागाचे कामकाज सुरू आहे. कोविडमुळे धास्तावलेल्या संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अक्षम्य चुका होत आहेत.तुर्भे सेक्टर २१ येथील प्रदीप गायकवाड या तरुणाचा २0 मे २0२0 रोजी मलेरियामुळे महापालिकेच्या वाशी येथील प्रथमसंदर्भ रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याची कोविड चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. त्यामुळे अंत्यविधीसाठी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अंत्यविधीच्या काही दिवसांनंतर प्रदीपच्या नातेवाइकांनी मृत्यू दाखल्यासाठी महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालयात अर्ज केला.परंतु रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या कागदपत्रांवर मृतांच्या वारसांचा नामोल्लेख नसल्याने मृत्यू दाखल्यावर वारसदारांची नावे टाकता येणार नाहीत, असे त्यांना सांगण्यात आले. तसेच रुग्णालयाने लिहून दिल्यास वारसदारांच्या नावांचा समावेश करता येईल, असेही विभाग कार्यालयाकडून स्पष्ट करण्यातआले.त्यानुसार मृताच्या नातेवाइकांनी रुग्णालयातून वारसदारांची नावे समाविष्ट करण्याबाबतचे लिखित पत्रही आणले. परंतु त्यानंतरसुद्धा मृत्यू दाखल्यात वारसांची नावे समाविष्ट करणे नियमाने शक्य नसल्याचे नातेवाइकांना सांगण्यातआले.प्रदीप गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, चार महिन्यांची मुलगी आणि आई असा परिवार आहे. प्रदीप हा एकटा कमविणारा होता. त्याच्या मृत्यूनंतर तो नोकरी करीत असलेल्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर त्याच्या पत्नीला संधी मिळण्याची शक्यता आहे. परंतु त्यासाठी वारसदारांच्या नावासह पतीच्या मृत्यू दाखल्याची गरज आहे. पतीच्या निधनानंतर त्याची पत्नीच खरी वारसदार असते. असे असतानाही मृत्यू दाखल्यात मयत प्रदीप गायकवाड याच्या वारसांच्या नावांचा समावेश करण्याबाबत संबंधित विभाग चालढकल करीत असल्याचा आरोप प्रदीपचे काका भास्कर गायकवाड यांनी केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका