शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

नालेसफाईवर नगरसेवक नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 02:42 IST

स्थायी समितीमध्ये पडसाद : दिघासह घणसोली परिसरातील स्थिती गंभीर

नवी मुंबई : पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाचे तीव्र पडसाद स्थायी समितीमध्ये उमटले. एमआयडीसी, गावठाण, घणसोलीसह दिघा परिसरामध्ये नाल्यांमधील गाळ काढण्यात आला नाही. अशीच स्थिती राहिली तर पावसाळ्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही नगरसेवकांनी दिला.नवी मुंबई महानगरपालिकेने एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्येच पावसाळापूर्व नालेसफाईची कामे सुरू केली आहेत. महापौर जयवंत सुतार, आयुक्त रामास्वामी एन. यांनी विभागनिहाय नालेसफाईच्या कामांची पाहणी केली आहे. यानंतरही अनेक ठिकाणी समाधानकारक कामे झालेली नाहीत. स्थायी समितीमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामावर नाराजी व्यक्त केली. शहरात वृक्षछाटणीची कामे वेळेवर होत नाहीत. नगरसेवकांनी पाठपुरावा केल्यानंतरही कर्मचारी वेळेवर येत नाहीत. १० वाजल्यानंतर वृक्षछाटणी कर्मचाºयांचे काम सुरू होत असून अनेक ठिकाणी धोकादायक असलेल्या फांद्या काढण्यात आलेल्या नाहीत. शहरातील होल्डिंग पाँडची साफसफाई केली जात नाही. त्यामधील गाळ जैसे थे असून, त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये नालेसफाईची कामे संथगतीने सुरू असल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली.दिघा परिसरामध्ये नालेसफाईची कामे सुरूच झाली नसल्याबद्दल नवीन गवते यांनी लक्ष वेधले. दिघा परिसरावर नेहमीच अन्याय होत आहे. दोन महिन्यांपासून विभाग अधिकारी नाही. नागरिकांनी तक्रारी करायच्या कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठ्या नाल्यांमध्ये गाळ साचला असून तो काढला जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. घणसोलीमध्ये अनेक ठिकाणी गटारेच अस्तित्वात नाहीत. तेथील कामे समाधानकारक नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. अनेक ठेकेदार गटाराच्या झाकणाजवळीलच गाळ काढत आहेत. पूर्ण गटारांची साफसफाई केली जात नाही. ठेकेदाराने काम व्यवस्थित केले आहे का, याची पाहणी करावी व निष्काळजीपणा करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी नगरसेवकांनी केली. सर्वसाधारण सभेमध्ये आपत्ती व्यवस्थापनावर लक्षवेधी घेतली असती, तर सर्व १११ नगरसेवकांनी त्यांची व्यथा मांडली असती. प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्या, अशी मागणीही केली.नगरसेवकांनी त्यांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. ज्या परिसरामध्ये नालेसफाईची कामे रखडली आहेत, तेथे विशेष लक्ष द्यावे. दिघा, घणसोली, एमआयडीसी परिसरासह सर्व ठिकाणची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावी.- सुरेश कुलकर्णी,सभापती स्थायी समितीज्वेल्स आॅफ नवी मुंबईमधील स्थिती बिकट झाली आहे. आरोग्य चांगले राहावे, यासाठी नागरिक तेथे व्यायामासाठी जातात; पण दुर्गंधीमुळे त्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.- सुनील पाटील,नगरसेवक प्रभाग ९२२५ मे पूर्वी कामे पूर्ण होणारघनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त तुषार पवार यांनी, पावसाळापूर्व नालेसफाईची कामे वेगाने सुरू आहेत. दिघा व इतर ठिकाणच्या सहा नाल्यांचे काम निविदा प्रक्रियेमुळे रखडले होते. ती कामेही पूर्ण झाली आहेत. सर्व कामे २५ मेपूर्वी पूर्ण केली जाणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई