शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘नैना’च्या पहिल्या टीपी स्कीमला मंजुरी, पहिल्या टप्प्यात सात नगररचना परियोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 07:10 IST

गतपाच वर्षांपासून प्लॅनिंग आणि शासनाच्या परवानगीच्या गर्तेत सापडलेल्या ‘नैना’ प्रकल्पातील पहिल्या नगररचना परियोजना अर्थात टीपी स्कीमला अखेर मंजुरी मिळाली आहे.

नवी मुंबई  - गतपाच वर्षांपासून प्लॅनिंग आणि शासनाच्या परवानगीच्या गर्तेत सापडलेल्या ‘नैना’ प्रकल्पातील पहिल्या नगररचना परियोजना अर्थात टीपी स्कीमला अखेर मंजुरी मिळाली आहे. ‘नैना’ क्षेत्रातील आकुर्ली, बेलवली व सांगडे या गावांतील १९.१२ हेक्टर क्षेत्रफळाच्या विकासासाठी ही प्रारूप योजना मंजूर करण्यात आली आहे. याअंतर्गत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ‘नैना’ क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे.‘नैना’ क्षेत्राच्या विकासाला सिडकोकडून पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याची ओरड या क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांकडून केली जात होती. सुरुवातीच्या काळात ‘नैना’ क्षेत्राचा विकास ऐच्छिक योजनेच्या माध्यमातून करण्याची योजना होती; परंतु तेथील जमीनधारकांकडून व विकासकांकडून या योजनेला फारसा प्रतिसाद लाभला नाही. परिणामी, नगररचना परियोजना (टीपी स्कीम) लागू केल्याशिवाय ‘नैना’ क्षेत्राचा विकास साधणे शक्य नसल्याचे सिडकोच्या लक्षात आले. त्यानुसार सिडकोने कार्यवाही सुरू केली होती. आकुर्ली गाव परिसरात सुमारे ५० एकर क्षेत्राची पहिली टीपी स्कीम तयार करून मंजुरीसाठी ती राज्य शासनाकडे पाठविण्यात आली होती.राज्य शासनाच्या संबंधित विभागाने त्यात काही सुधारणा सुचविल्या होत्या. या सुधारणेनंतर २१ सप्टेंबर २0१८ रोजी मुंबई महानगर प्रदेशातील गेल्या तीन दशकांतील पहिल्या नगररचना परियोजना अर्थात टीपी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.दरम्यान, नगररचना परियोजनेला तेथील भूधारकांनी संमती दर्शविल्यानेच सिडकोने एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क सात टीपी स्कीमचे नियोजन केले आहे. पुढील दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने त्यावर अंमलबजावणी केली जाणार आहे. असे असले तरी पहिल्या टीपी स्कीमला मंजुरी मिळाल्यानंतर आणखी दोन योजना अंतिम टप्प्यात आहेत. यापैकी दुसरी योजना अवलोकनासाठी पुणे येथील नगररचना संचालकाकडे पाठविण्यात आली आहे. तर ४४० हेक्टर क्षेत्रफळावर आकार घेणाºया तिसºया योजनेबाबत ४ व ६ आॅक्टोबर रोजी जमीनमालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या तिन्ही योजनांची अंमलबजावणी झाल्यास या क्षेत्रात ७० कि.मी. लांबीचे रस्ते, ८२ हेक्टर क्षेत्रफळाची मोकळी मैदाने, ३० हेक्टरवर पायाभूत सुविधा तर ३६ हेक्टर जागेवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गृहनिर्मिती करता येईल, असे सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.पहिल्या टप्प्यात सात टीपी स्कीमचे नियोजन‘नैना’च्या पहिल्या टप्प्यातील २३ गावांच्या विकास आराखड्याला शासनाची मंजुरी मिळाली असल्याने या क्षेत्राचा विकास साधण्याकरिता सिडकोने एकूण सात टीपी स्कीमचे नियोजन केले आहे. पुढील दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने त्यावर अंमलबजावणी केली जाणार आहे.

टॅग्स :cidcoसिडको