शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"एन. डी. पाटील हे विचारांची निष्ठा जपणारे व्यक्तिमत्त्व"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 00:00 IST

शेतकरी, शेतमजूर, कामगार आदिवासी पाड्यातील सर्वसामान्य माणसाचे जीवन उंचावण्यासाठी त्यांचे अविरत कार्य सुरू असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उत्पादन शुल्क व कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काढले.

पनवेल : विचारांची निष्ठा जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून एन. डी. पाटील यांचा संपूर्ण महाराष्ट्राला परिचय आहे. महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीचे अग्रणी आणि समाजातील सर्वसामान्यांच्या जीवनाशी एकरूप झालेले पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान होत आहे, हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. सर्वसामान्य माणसाच्या न्यायासाठी, सीमा भागातील मराठी बांधवांच्या हक्कासाठी आणि शेतकरी, शेतमजूर, कामगार आदिवासी पाड्यातील सर्वसामान्य माणसाचे जीवन उंचावण्यासाठी त्यांचे अविरत कार्य सुरू असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उत्पादन शुल्क व कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काढले.जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व स्व. जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव पुरस्कार सोहळा खांदा वसाहतीतील चांगू काना ठाकूर महाविद्यालयात पार पडला. या कार्यक्रमाला दिलीप वळसे-पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.ते म्हणाले, महाराष्ट्रामधील थोर समाज सुधारकांमध्ये ज्यांचे नाव अग्रगण्याने घेतले जाते, त्यापैकी एन. डी. पाटील एक आहेत. पाटील यांचे जीवन म्हणजे अखंड संघर्ष असून, हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे. त्यामुळे चळवळीचे शास्त्र आणि शस्त्र स्वत:च्या कृतीतून विकसित करणारे लोकनायक एन. डी. पाटील यांना जीवन गौरव प्रदान करताना आनंद होत असून संघर्षाच्या लोकनायकाचा गौरव स्फूर्ती देणारा असल्याचे विचार वळसे-पाटील यांनी या वेळी मांडले.व्यासपीठावर समारंभाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री आशिष शेलार, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार महेश बालदी, एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोजिनी पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, भगीरथ शिंदे, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, उपमहापौर जगदीश गायकवाड, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात आदिती तटकरे, आशिष शेलार, श्रीरंग बारणे यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत, एन. डी. पाटील यांच्या कार्याचा गौरव करीत जनार्दन भगत यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, बबन पाटील, संजीव पाटील, मीना जगधने, दशरथ भगत, अरुण भगत, व्हाइस चेअरमन वाय. टी. देशमुख, संचालक शकुंतला ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, संजय भगत, हरिश्चंद्र पाटील, अनिल भगत, संजय पाटील, अतुल पाटील, नगरसेवक सतीश पाटील उपस्थित होते.>आयुष्यात रुळलेल्या वाटेवरून न चालता, नवीन वाट निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. मळलेल्या वाटेने कुणीही जातो; पण जो स्वत:चा मार्ग तयार करतो, तोच जीवनात यशस्वी होतो, असे मनोगत एन. डी. पाटील यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केले. जनार्दन भगत यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचेही त्यांनी या वेळी कौतुक केले.