शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

पत्नीवर चाकूने वार केले; मेहुण्याला हत्येची माहिती देऊन पतीने पोलीस ठाणे गाठले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 08:06 IST

पतीने स्वतःला केले पोलिसांच्या स्वाधीन

नवी मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना नेरुळ सेक्टर १० येथे घडली. दोघांचा प्रेमविवाह असूनदेखील पतीचा तिच्या चारित्र्यावर संशय होता. यावरून रविवारी त्यांच्यात वाद झाल्याने, पतीने हातोडी व चाकूने पत्नीची हत्या करून पोलीस ठाणे गाठले.पल्लवी संदेश पाटील (वय ३२) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा संदेश पाटील याच्यासोबत दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला असून त्यांना एक मुलगीदेखील आहे; परंतु कोरोनामुळे मुलीला सध्या गावी ठेवले होते. नेरुळ सेक्टर १० येथे दोघे भाड्याने राहत होते. संदेश हा झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय आहे. रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास त्याने पत्नी पल्लवी हिच्या डोक्यात हातोडी मारून बेशुद्ध केले. त्यानंतर चाकूने अंगावर अनेक वार करून तिची हत्या केली. यानंतर त्याने पल्लवीच्या भावाला हत्येची माहिती देऊन तिच्या मदतीसाठी ॲम्ब्युलन्स घेऊन जाण्यास सांगून स्वतः नेरुळ पोलीस ठाणे गाठले. त्याने पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पल्लवी या रक्तबंबाळ अवस्थेत घरात पडलेल्या होत्या. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.लग्नानंतर काही वर्षांतच संदेश हा पल्लवीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. यावरून त्यांच्यात सतत भांडण होत होते. पल्लवीच्या कुटुंबीयांनी अनेकदा समजूतदेखील काढली होती. यावरून रविवारी दुपारी त्याने पल्लवीचा भाऊ सागर जाधव याची भेट घेऊन पल्लवीच्या वागण्याबाबत संशय व्यक्त केला होता. त्यानंतर रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास त्याने पत्नी पल्लवी हिची हत्या करून स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून, हत्येचा गुन्हा दाखल केल्याचे नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्याम शिंदे यांनी सांगितले.