शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

गोवर रूबेला लसीकरणाविषयी महापालिकेची कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 05:31 IST

डॉक्टरांची उपस्थिती : अभियान यशस्वी करण्याचा निर्धार

नवी मुंबई : महानगरपालिकेने गोवर रूबेला लसीकरणाची माहिती देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी शहरातील बालरोगतज्ज्ञांसह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आयुक्त रामास्वामी एन. यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

गोवर आणि रूबेला हे संक्र मक आजार असून याचा संसर्ग कुणालाच होऊ नये याविषयी खबरदारीसाठी भारत सरकारच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारा गोवर रूबेला लसीकरण कार्यक्र म २0१८ नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आपण सर्वांच्या सहयोगातून १00 टक्के यशस्वीरीत्या राबवू असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. गोवर रूबेला लसीकरण करण्यात यावे याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मागील ७ ते ८ वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. आता याविषयी सकारात्मक भूमिका घेत संपूर्ण देशभरातच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे याबद्दल समाधान व्यक्त केले. गोवर, रुबेला लसीकरण मोहीमही ९ महिने ते १५ वर्षाआतील मुलांमध्ये यशस्वीरीतीने पार पाडण्याचा विश्वास व्यक्त केला.नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण राज्यभरात गोवर रूबेला लसीकरण हाती घेण्यात येऊन विशेषत्वाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खासगी व महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये १0 वीपर्यंतच्या मुलांना हे लसीकरण करण्यात येणार आहे. याकरिता आरोग्य, शिक्षण व समाजविकास या महापालिकेच्या विभागांसह विविध स्वयंसेवी संस्था, मंडळे यांच्या परस्पर सहयोगातून तसेच बालरोगतज्ज्ञ यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. या मोहिमेविषयी माहिती व प्राथमिक स्वरूपाची चर्चा यावेळी करण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, शिक्षणाधिकारी संदीप संगवे, डॉ. प्रशांत जवादे, डॉ. रत्नप्रभा चव्हाण, जागतिक आरोग्य संघटनेचे पर्यवेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण काटकर, डॉ. प्रतीक तांबे, डॉ. वंदना निकुंभ, विनय अडप्पा, लीना बजाज, अहमद कुरेशी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका