शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
2
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
3
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
4
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
5
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
6
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
7
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
8
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
9
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
10
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
11
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
12
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
13
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
14
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
15
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
16
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
17
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
18
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
19
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
20
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 00:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. त्यानुसार बंद करण्यात आलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या हलचाली सुरू करण्यात आल्या आहेत. तर सध्या सुरू असलेल्या कोविड उपचार केंद्रांत रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. 

गेल्या वर्षी दिवाळीनंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागल्याने शहरातील अनेक कोविड सेंटर बंद करण्यात आले. महापालिकेच्या माध्यमातून एकूण १४ कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. त्यापैकी बारा केंद्र बंद करण्यात आले आहेत. यात वाशी सेक्टर १४, सीबीडी सेक्टर ३ येथील कोविड केअर सेंटर, नेरूळ येथील आगरी कोळी भवन, नेरूळ सेक्टर ९ येथील कोविड सेंटर, नेरूळ सेक्टर ५ येथील सावली कोविड सेंटर, ऐरोली सेक्टर ५ येथील समाज मंदिर, वाशी येथील इ.टी.सी केंद्र, कोपरखैरणे सेक्टर ५ येथील बहुउद्देशीय इमारतीतील केंद्र, ऐरोली सेक्टर १५ येथील लेवा पाटीदार सभागृह, तुर्भे सेक्टर येथील निर्यात भवन, तुर्भे सेक्टर २४ येथील राधास्वामी सत्संग भवन व वाशी येथील महापालिका रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड सेंटर या उपचार केंद्रांचा समावेश आहे.

रग्ण कमी होत असल्याने महापालिकेने बंद केलेल्या कोविड केंद्राच्या जागा संबंधित संस्थांना परत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा ताब्यात घेण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. त्यानुसार संबंधित जागांची साफसफाई आणि इतर आवश्यक कामे केली जात आहेत. औषधे आणि कर्मचाऱ्यांचे नियोजन केले जात आहे. रुग्णवाढीचा वेग वाढल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे  मास्कचा वापर, सॅनिटायझर्स आणि सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे. 

१२४८ रुग्णांवर शहरात उपचारनवी मुंबईत सध्या महापालिकेचे वाशी येथील सिडको एक्झिबिशनमध्ये एकमेव उपचार केंद्र सुरू आहे. या केंद्रात २५४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर उर्वरित रुग्णांपैकी काही  नेरूळ येथील डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात तर काही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. सध्या महापालिकेचे वाशी येथील सिडको एक्झिबिशन केंद्रातील एकमेव उपचार केंद्र सुरू आहे. परंतु खबरदारीच्या उपाययोजना म्हणून तुर्भे येथील बंद केलेले दोन उपचार केंद्र राखीव ठेवण्यात आली आहेत. - अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका