शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अन् मेडिकल कॉलेजला सीएसआर फंडाचा मिळणार बूस्टर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2023 14:41 IST

प्रकल्पाचे मंदा म्हात्रे यांनी आयुक्त दालनात केले सादरीकरण 

नवी मुंबई:आजही सर्व सामान्य व गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. बुद्धीमत्ता असूनही तरुणांना व तरुणींना डॉक्टरकी मिळण्यापासून वंचित राहावे लागत होते.

याच अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी अथक पाठपुरावा करून नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्राजेश नार्वेकर यांच्या दालनात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, सदरचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे 8.40 एकरामध्ये उभारला जाणार असून अंदाजे 819.30 कोटी खर्च येणार आहे. त्याकरिता त्यांच्यासह महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर हे CSR Fund करिता पर्यंत करणार आहे. 

हॉस्पिटल हे G+9 एवढ्या मजल्याचा असणार आहे. तसेच कँसर, हृदय, मेंदू अश्या अनेक मोठ मोठ्या आजारांवर  सेवा दिली जाणार आहे. जे काही आजार असेल त्या उपचाराकरिता लागणारी सर्व यंत्रणा, शस्त्रक्रिया व इतर सुविधा ह्या प्रत्येक मजल्यावर उपलब्ध होणार आहे.  तसेच सदर हॉस्पिटलमधील रुग्णाची क्षमता ही 500 बेड हून अधिक असून हॉस्पिटल पूर्णत: सर्व सुविधयुक्त बनणार आहे. तसेच त्या पुढे म्हणाल्या की,  सदरच्या क्षेत्रफळामध्ये पीजी/नर्सिंग शैक्षणिक वसतिगृह, पदव्युत्तर शैक्षणिक संकुल, अभियांत्रिकी यार्ड, रुग्णांनसोबत येणाऱ्या नातेवाईकांना राहण्याकरिता धर्मशाळा, नर्सिंग वसतिगृह, अभ्यागत केंद्र, पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृह, वाहनतळ व इतर अनेक सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच सदर उभारल्या जाणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजवर पूर्ण नियंत्रण हे नवी मुंबई महानगरपालिकाचे असणार आहे व सदर प्रकल्पामध्ये अजून काही सुविधा व उपाय करता येईल का असे आदेश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, सर्व प्रकारच्या व्यक्तींना सुसज्ज आरोग्य सुविधा मिळणे हे अत्यावश्यक आहे. पुढील काही वर्षात नवी मुंबईत होणारा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज नवी मुंबईकरांसाठी क्रांती ठरेल. तसेच नवी मुंबई हद्दीतील रुग्णांना उपचाराकरिता बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे रुग्णांचा वेळ व पैसा वाचणार आहे. तसेच स्थानिक नागरिकांना रोजगार निर्माण आहे. यावेळी म्हात्रे यांनी सांगितले कि, सदर प्रकल्प हा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी व नवी मुंबई महानगरपालिका, सिडको मधील संबंधित अधिकाऱ्याच्या प्रयत्नांमुळे उभा राहणार आहे. लवकरच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. म्हात्रे यांच्या समवेत न.मुं.म.पा आयुक्त राजेश नार्वेकर,  न.मुं.म.पा अतिरिक्त आयुक्त, . संजय काकडे,  शहर अभियंता संजय देसाई, उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई