शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:58 IST

नवी मुंबईतील लोकप्रतिनिधींची टीका; सर्वसाधारण सभेमध्ये लक्षवेधी; नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप

नवी मुंबई : महापालिका आरोग्य विभागासाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे; परंतु शहरवासीयांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळत नाहीत. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून, जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. आरोग्य विभागाची स्थिती अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णासारखी झाली असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केले आहे.सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी आरोग्याच्या विषयावर लक्षवेधी मांडली होती. राज्यातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत; परंतु महापालिकेचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर असल्याची टीका केली. पाच वर्षांत या विभागाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून याला नक्की जबाबदार कोण? असा सवालदेखील उपस्थित करण्यात आला. इतर महापालिकांप्रमाणे नवी मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग सक्षम का होत नाही, असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला. महापालिकेच्यातिजोरीत भरलेला जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च होणार नसेल तर त्याचा उपयोग काय? असा सवाल उपस्थित करीत महापालिका रुग्णालयांमध्ये शहरातील नागरिकांपेक्षा शहराबाहेरील नागरिकांना जास्त लाभ मिळत असून यामुळे शहरातील नागरिकांना सुविधांपासून वंचित राहत असल्याची टीका नगरसेवकांनी केली. वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब सोनावणे, आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी लोकप्रतिनिधींनी आरोग्य विभागाचा कारभार सुधारण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांविषयी माहिती दिली. शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचीही मदत महापालिका घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.नियमित भरतीसाठी प्रकिया पूर्ण केली आहे. निवड केलेले उमेदवार कायमस्वरूपी काम करण्यास तयार आहेत, याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे. शहरातील खासगी रुग्णालयातील सुपर स्पेशालिस्ट महापालिकेत काम करण्यासाठी योजना बनविण्यास सांगण्यात आले आहे. येत्या १५ दिवसांत याबाबत निर्णय होईल.- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्तगेल्या दोन वर्षांत आरोग्य विभागात काहीअंशी सुधारणा झाली आहे. डॉक्टरांच्या नियुक्ती, स्टाफ नर्सच्या नियुक्ती वैगरे झाले आहे. सर्व सदस्यांनी मांडलेल्या सूचनांची प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच यापुढे अशा लक्षवेधी येणार नाही याची काळजी घ्यावी.- जयवंत सुतार, महापौरनवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात ७० टक्के शहरातील नागरिक आणि ३० टक्के शहराबाहेरील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी नियोजन करण्यात यावे. यासाठी ओळखपत्र आणि आधार कार्डचा वापर करण्यात यावा. दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.- विजय चौगुले, विरोधी पक्षनेतेऐरोली आणि नेरु ळ येथे एनआयसीयू विभाग सुरू केले आहेत. बेलापूर रु ग्णालयात नैसर्गिक प्रसूती करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आवश्यक पदांची भरती सुरू असून डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे.- बाळासाहेब सोनावणे, आरोग्य अधिकारीमनुष्यबळाची कमतरतासर्वपक्षीय नगरसेवकांनी आरोग्य विभागामधील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. रुग्णालयासाठी अर्थसंकल्पामध्ये चांगली तरतूद केली जाते. खर्चही मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे; परंतु योग्य पद्धतीने उपचार मिळत नाहीत.नवीन रुग्णालये पूर्ण क्षमतेने चालविली जात नाहीत. डॉक्टरांची कमतरता आहे. पूर्ण भार प्रथम संदर्भ रुग्णालयावर पडू लागला आहे.महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणीही नगरसेवकांनी केली.रु ग्णालयातील वार्डमध्ये २० ते २५ बेड असतात; परंतु त्या ठिकाणी फक्त दोनच स्टाफ नर्स असतात त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण असतो. महापालिकेच्या आरोग्य विभागात झालेल्या भरतीमध्ये गैरव्यवहार झाला आहे. ठोक मानधन आणि कंत्राटीपद्धतीने काम करणाºया कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुविधा नसून भरती प्रक्रि येत शहरातील तरु णांना संधी मिळायला हवी.- संजू वाडे, प्रभाग क्र. १२पालिका रुग्णालयातील बेड अनेक वेळा फुल्ल असतात. त्यामुळे शहरातील गोरगरीब नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. डम्पिंग ग्राउंडमुळे पसरलेल्या रोगराईमुळे अनेक नागरिक दगावले आहेत.- राजेश शिंदे, नगरसेवकप्रभागातील उच्च दाबाच्या विद्युत वीजवाहिनींखाली स्वच्छतेचा अभाव आहे, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.- ममित चौगुले, प्रभाग २३महापालिकेच्या रु ग्णालयांमध्ये अनेक प्रकारची औषधे उपलब्ध नसतात. शहरात एखादी दुर्घटना घडली तर काय नियोजन आहे.- प्रशांत पाटील, प्रभाग ३२रु ग्णालयातील सर्व तपशील ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा असावी. त्या विभागात डॉक्टर आसनाची आवश्यकता नाही. रु ग्णालयातील सुविधांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष अधिकाºयांची नेमणूक करावी.- डॉ. जयाजी नाथ, प्रभाग १०४नेरु ळ येथील बाल माता रु ग्णालयातही बेड उपलब्ध नाहीत म्हणून रुग्णांना डावलले जाते, तसेच त्यांना डी. वाय. पाटील सारख्या इतर रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो.- सुनीता मांडवे, प्रभाग ८७महापालिकेच्या रु ग्णालयांतील सुविधांची अवस्था बिकट आहे. होणाºया चौकांमध्ये सुधारणा करण्यात यावी. उपचारासाठी शहरातील नागरिकांना प्राधान्य देण्यात यावे.- रंगनाथ औटी, प्रभाग ८४महापालिकेच्या अर्थसंकल्पात १५० कोटी रु पयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे; परंतु या पैशाचा योग्य वापर होत नाही. खासगी रुग्णालयापेक्षाही दर्जेदार सुविधा मनपा रुग्णालयात मिळाल्या पाहिजेत.- नामदेव भगत, प्रभाग ९३शासनाच्या विविध आरोग्य योजनांमुळे खासगी रुग्णालयात मोफत उपचारांबाबत अनेक नागरिकांना माहिती नाही, त्यामुळे पालिका रु ग्णालयात नागरिकांची गर्दी असते. या योजनांची माहिती देण्यासाठी एक केंद्र स्थापन करण्यात यावे, यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होईल.- किशोर पाटकर, प्रभाग ६१केसपेपर काढण्यासाठी नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. यामध्ये रुग्ण, गर्भवती महिलांचाही समावेश असतो, ही बाब खेदनीय असून यासाठी अशा रु ग्णांसाठी वेगळी सुविधा असावी.- सोमनाथ वास्कर, प्रभाग ७४गेल्या साडेचार वर्षांत आरोग्य विभागावर जास्त चर्चा झाली; परंतु सुधारणा न होणे ही शोकांतिका आहे. आरोग्य विभागावर लक्षवेधी का घ्यावी लागते.- द्वारकानाथ भोईर, प्रभाग ३०चांगल्या डॉक्टरांना टिकवून ठेवणे गरजेचे असून डॉक्टरांबाबत दुजाभाव करण्यात येऊ नये. रु ग्णसेवा चांगल्या प्रकारे देण्यात यावी.- मनोज हळदणकरमहापालिकेच्या रु ग्णालयात विविध चाचण्या करण्याच्या माध्यमातून रु ग्णांची आर्थिक लूट केली जात आहे. तपासणी शुल्काचे रेट कार्ड बसविण्यात यावेत.- घनश्याम मढवीतुर्भे येथील रु ग्णालय आजही पूर्णपणे सुरू झालेले नाही. या ठिकाणी एनआयसीयू सारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यास वाशीच्या रु ग्णालयावरील भार कमी होईल.- शुभांगी पाटील, प्रभाग ६७

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका