शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीबाबत मार्गदर्शक सूचना, सांस्कृतिक कार्यक्रमांवर पालिकेची बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 00:34 IST

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : विशेषत: कोणत्याही मिरवणुका किंवा प्रभात फेऱ्या न काढता महामानवाला घरीच अभिवादन करावे, असे महापालिकेने सूचित केले आहे.

नवी मुंबई : कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साध्या आणि घरगुती पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. विशेषत: कोणत्याही मिरवणुका किंवा प्रभात फेऱ्या न काढता महामानवाला घरीच अभिवादन करावे, असे महापालिकेने सूचित केले आहे.सध्या राज्यात कोरोनाचा झपाट्याने संसर्ग वाढला आहे. रूग्णसंख्या वाढत आहे. त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. राज्य सरकारने मिशन ब्रेक द चेन अंतर्गत अनेक प्रतिबंधात्मक उपायोजना आखल्या आहेत. त्या अंतर्गत काही निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांसह धार्मिक सोहळे आणि लग्न समारंभ आदींसाठी काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने बुधवार १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही साध्या आणि घरगुती पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी मिरवणुका, बाइक रॅली काढता येणार नाहीत. त्याऐवजी चार ते पाच लोकांच्या उपस्थितीत महामानवाच्या प्रतिमेस किंवा पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करावे. यावेळी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवाश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सकाळी ७ ते संध्याकाळी ८ या वेळेतच हे कार्यक्रम आयोजित करावेत. त्या निमित्ताने कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ नये, कोरोनाचे नियम पाळून रीतसर परवानगी घेऊन आरोग्य शिबिरे किंवा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यास अनुमती देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनतेने कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करून, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पनवेलमध्ये होणार आरोग्य शिबीरे पनवेल : डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंती निमित्त पनवेलमध्ये विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या वतीने पनवेल परिसरात रक्त प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत सीकेटी महाविद्यालय खांदा कॉलनी , कामोठेतील सुषमा पाटील विद्यालय ,खारघर मधील रामशेठ ठाकूर शाळेत हे प्लाझ्मा दान शिबिर आयोजित आहे. पीपल्स इम्पावरमेंट सोसायटी आणि राहुल शिक्षक प्रसारक मंडळ संचलित लुंबिनी आरोग्य केंद्र यांच्या विद्यमाने महिलांसाठी खारघरला आरोग्य शिबिर होणार आहे. डॉ. कपिल चावरे, डॉ. प्रणिता डोंगरगावकर , शुभांशू भालेधर आदी तज्ज्ञ डॉक्टर महिलांची मोफत तपासणी करणार आहेत.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीNavi Mumbaiनवी मुंबई