शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

घणसोलीतील अनधिकृत मार्केट हटवण्यात पालिका अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 04:33 IST

सदर भूखंड सिडकोच्या ताब्यात असल्याचे कारण पुढे करत, त्यावरील अतिक्रमण हटवण्याची जबाबदारीही सिडकोवर ढकलण्यात आली आहे.

नवी मुंबई : १७ वेळा प्रयत्न करूनही घणसोलीतील अनधिकृत मटण मार्केट हटवण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. अखेर सदर भूखंड सिडकोच्या ताब्यात असल्याचे कारण पुढे करत, त्यावरील अतिक्रमण हटवण्याची जबाबदारीही सिडकोवर ढकलण्यात आली आहे. मात्र, पालिका अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण हितसंबंधामुळे सदर अनधिकृत मार्केट हटवण्यात चालढकल होत असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे.घणसोली सेक्टर ४ येथील भूखंड क्रमांक २१६ हा फेरीवाल्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. मात्र, सिडकोने फेरीवाल्यांसाठी राखीव ठेवलेल्या या भूखंडावर अनेक वर्षांपासून अनधिकृत मटण मार्केट चालवले जात आहे. तर काही दूधविक्रेत्यांनी व टेलिफोन बुथचालकांनीही बाहेरची जागा इतर फेरीवाल्यांना भाड्याने दिलेली आहे. त्या ठिकाणी उघड्यावर होणारी प्राण्यांची हत्या, परिसरात पडलेले मांसाचे तुकडे यामुळे लगतच्या रहिवासी सोसायट्यांमधील नागरिक त्रस्त आहेत. या प्रकरणी त्यांनी पालिका विभाग अधिकारी, आयुक्त यांच्यासह मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केलेली आहे; परंतु प्रत्येक वेळी पालिकेकडून त्या ठिकाणी कारवाईचा दिखावा केला जात आहे. यामुळे मागील काही वर्षांत त्या ठिकाणी १७ वेळा कारवाई करूनही अनधिकृत मटण मार्केट बंद झालेले नाही. सकाळी कारवाई झाल्यानंतर दुपारी पुन्हा मार्केट जसेच्या तसे उभे असते. त्यांच्यामागे पालिका अधिकाºयांचे अर्थपूर्ण हितसंबंध असल्याने सदर भूखंड कायमचा अतिक्रमणमुक्त केला जात नसल्याचाही रहिवाशांचा आरोप आहे. त्या ठिकाणी जमा होणारा दुर्गंधीयुक्त कचरा रात्रीच्या वेळी परिसरातील नाले व गटारांमध्ये टाकला जातो, असे प्रकार स्थानिकांनी वेळोवेळी उघडकीस देखील आणून दिलेले आहेत. त्यानंतरही अनधिकृत मटणविक्रेत्यांवर ठोस कारवाई अथवा गुन्हे दाखल केले जात नसल्याचा संताप व्यक्त होत आहे.अखेर स्थानिक नगरसेविका उषा कृष्णा पाटील यांनी महासभेकडे या संदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर आयुक्तांकडून मिळालेल्या लेखी उत्तराने प्रशासनाच्याच कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे. यापूर्वी त्या ठिकाणी १७ वेळा कारवाई झाल्याचे लेखी उत्तर काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने पाटील यांना दिलेले आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या महासभेच्या प्रश्न-उत्तरांमध्ये त्या ठिकाणी १२ वेळा कारवाई झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पालिका आयुक्तच थेट भ्रष्ट अधिकाºयांना पाठीशी घालण्यासाठी माहिती दडपत असल्याचाही आरोप नगरसेविका उषा पाटील यांनी केला आहे. तर मटण मार्केटसाठी देखील जागा राखीव असतानाही फेरीवाल्यांसाठीच्या भूखंडावरील मटण विक्रेत्यांचे त्या ठिकाणी स्थलांतरण करण्यात चालढकल होत असल्याचाही त्यांचा आरोप आहे. त्याकरिता १७ वेळा कारवाई करूनही मटण मार्केट हटत नसल्याने तो भूखंड सिडकोच्या ताब्यात असल्याचे कारण पुढे करून त्यावर कारवाईचीही सिडकोची जबाबदारी असल्याचे कारण पुढे केले जात असल्याचा आरोप होत आहे.घणसोली हावरे चौकालगतच उघड्यावर होत असलेल्या मांसविक्रीमुळे त्रास होत असल्याच्या परिसरातील रहिवाशांच्या तक्रारी आहेत. आजवर पालिकेने त्या ठिकाणी १७ वेळा कारवाई केलेली आहे; परंतु अद्यापही ते मार्केट जसेच्या तसे असल्याने प्रशासनाला प्रश्न विचारण्यात आला होता. या वेळी पालिका अधिकाºयांचे अर्थपूर्ण हितसंबंध जोपासण्यासाठी सदर अनधिकृत मार्केटवरील कारवाईची जबाबदारी सिडकोवर ढकलण्यात आली आहे.- उषा कृष्णा पाटील,नगरसेविका

टॅग्स :MarketबाजारNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका