शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

महापालिकेने केली १७३२ कोटींची विक्रमी करवसुली, मालमत्ताकर ५३७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:56 IST

श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या नवी मुंबई पालिकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये तब्बल ११९५ कोटी रुपयांची वसुली केली आहे. एलबीटी कर विभागाने प्रथमच एक हजार कोटीचा टप्पा पूर्ण करून ११९५ कोटी रुपये महसूल संकलित केला असून मालमत्ता कर विभागाने ५३७ कोटी रूपये संकलित केले आहेत.

नवी मुंबई  - श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या नवी मुंबई पालिकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये तब्बल ११९५ कोटी रुपयांची वसुली केली आहे. एलबीटी कर विभागाने प्रथमच एक हजार कोटीचा टप्पा पूर्ण करून ११९५ कोटी रुपये महसूल संकलित केला असून मालमत्ता कर विभागाने ५३७ कोटी रूपये संकलित केले आहेत.नवी मुंबई महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी पदभार स्वीकारल्यापासून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यावर विशेष लक्ष दिले होते. उत्पन्न वाढ करण्याबरोबर योग्य त्या प्रकल्पावर खर्च करण्यावर भर दिला आहे. अनावश्यक कामे न करण्याच्या भूमिकेमुळे पालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच २ हजार कोटी रूपयांच्या ठेवी ठेवण्यात यश प्राप्त झाले आहे. पालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मालमत्ता व एलबीटी या दोन विभागांवर विशेष लक्ष दिले होते. वर्षभर ग्राहकांना बिलांचे वेळेत वाटप करणे. कर वसुलीचा नियमित आढावा घेणे यामुळे १९९५ पासून प्रथमच आर्थिक वर्षामध्ये १७३२ कोटी रूपये कर संकलित करण्यात यश आले आहे. गतवर्षी एलबीटी विभागाने ८८३ कोटी रूपयांची वसुली केली होती. या आर्थिक वर्षामध्ये पालिकेच्या तिजोरीमध्ये ११९५ कोटी रूपये जमा झाले आहेत. पहिल्यांदाच एक हजार कोटीचा टप्पा एलबीटी विभागाने ओलांडला आहे. मालमत्ता कर विभागानेही ५३७ कोटींची वसुली केली आहे.मालमत्ता कर थकबाकी वसूल करण्याचे आव्हान पालिकेसमोर उभे राहिले आहे. औद्योगिक वसाहतीमधील वसुलीसाठी बँक खाती सील करण्याची व कंपन्यांना सील करण्याची कडक कारवाई करता येत नाही. अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. या समस्यांनंतरही आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड व त्यांच्या टीमने मालमत्ता कर वसुलीही समाधानकारक केली आहे. मार्च महिन्यामध्ये १०५ कोटीची वसुली झाली आहे.एका महिन्यात प्रथमच एवढी वसुली झाली आहे. मालमत्ता कर विभागाने शेवटच्या महिन्यामध्ये थकबाकीदारांच्या दारात ढोल-ताशे वाजविण्यास सुरवात झाली होती. पालिकेचा हा प्रयोग यशस्वी झाला असून शेवटच्या महिन्यात विक्रमी वसुली होवू शकली आहे.वर्षभर कर वसुलीचे चांगले नियोजन केले होते. नियमीत आढावा घेण्यात येत होता. एलबीटी व मालमत्ता कर विभागातील सर्वांनी केलेल्या परिश्रमामुळे विक्रमी कर संकलन करणे शक्य झाले. शेवटच्या महिन्यात १०० कोटीपेक्षा जास्त वसुलीत यश आले आहे.- रामास्वामी एन.,आयुक्त महापालिकाआयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एलबीटी व मालमत्ता कर विभागाकडून कर संकलनासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते. यामुळेच कर संकलीत करण्यात यश आले.- धनराज गरड,मुख्य लेखा व वित्त अधिकारी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई