शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांनो, आता ‘जुन्नर’ हापूसची चव चाखा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 08:58 IST

कोकणच्या हापूसचा हंगाम संपत आल्यानंतर जुन्नर, आंबेगाव परिसरातील आंब्याची मार्केटमध्ये आवक सुरू होत असते.

नवी मुंबई : कोकणच्या हापूसचा हंगाम संपुष्टात आला असून रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील आवक तुरळक प्रमाणात सुरू आहे. जुन्नर आंबेगावमधील हापूसचा हंगाम सुरू झाला असून २० जूनपर्यंत हा आंबा उपलब्ध होणार आहे. बाजार समितीमध्ये १५ जूननंतर उत्तर प्रदेशमधील लंगडा, दशेरी आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे. यामुळे जुलैमध्ये ही ग्राहकांना आंब्याची चव चाखता येणार आहे.

कोकणच्या हापूसचा हंगाम संपत आल्यानंतर जुन्नर, आंबेगाव परिसरातील आंब्याची मार्केटमध्ये आवक सुरू होत असते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुरूड जंजिरा, बाणकोट परिसरातील हापूसचा हंगाम संपुष्टात आला आहे. गुजरातमधील हंगामही दोन दिवसांत संपुष्टात येणार आहे. सोमवारी बाजार समितीमध्ये राज्याच्या विविध भागांतून १२ हजार व इतर राज्यांमधून १३९३१ पेट्यांची आवक झाली आहे. जुन्नर, आंबेगाव परिसरातील हापूसचा हंगाम सुरू झाला आहे. प्रतिदिन जवळपास १० हजार पेट्यांची आवक होत आहे. होलसेल मार्केटमध्ये जुन्नर हापूसला २०० ते ५०० रुपये डझन एवढा दर मिळत आहे. २० जूनपर्यंत हा हंगाम सुरू राहील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 

जीआय मानांकनासाठी पाठपुरावा     भीमाशंकरच्या पट्ट्यात जुन्नर व आंबेगाव तालुक्यामधील आंबा प्रत्येक वर्षी जूनमध्ये मार्केटमध्ये येतो. या परिसरातील आंब्याचे उत्पादन वाढत असून प्रत्येक वर्षी ५ हजारांपेक्षा जास्त रोपांची लागवड होऊ लागली आहे.      शिवकाळापासून हा आंबा प्रसिद्ध असल्यामुळे त्याला शिवनेरी आंबा नावाने जीआय मानांकन मिळावे यासाठी शेतकरी व लोकप्रतिनिधी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत.

बाजार समितीमध्ये जुन्नर, आंबेगाव परिसरातून प्रतिदिन १० हजार पेट्यांची आवक सुरू झाली आहे. हा हंगाम २० जूनपर्यंत सुरू राहील. यानंतर उत्तर प्रदेशमधील आंब्याची आवक सुरू होईल. - संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट 

 

टॅग्स :Alphonso Mangoहापूस आंबा