शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मानवी तस्करीविरोधात मुक्ती बाइक चॅलेंज रॅली, आठ परदेशी रायडर्सचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 03:22 IST

लहान मुले व महिलांचे समाजात होणारे लैंगिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक शोषण आणि मानव तस्करी रोखण्यासाठी २७ आॅक्टोबर रोजी बंगळुरूहून मुंबईकडे मुक्ती बाइक चॅलेंज रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबई - लहान मुले व महिलांचे समाजात होणारे लैंगिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक शोषण आणि मानव तस्करी रोखण्यासाठी २७ आॅक्टोबर रोजी बंगळुरूहून मुंबईकडे मुक्ती बाइक चॅलेंज रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ओएसीस इंडिया हे या बाइक रॅलीचे आयोजक होते. हे या रॅलीचे दुसरे वर्ष असून, या बाइक रॅलीत आठ परदेशी, तर सात भारतीय रायडर्सचा समावेश होता. शनिवार, ३ नोव्हेंबर २०१८ ला मुंबईत या रॅलीची सांगता झाली.भारतात लहान मुले व महिलांच्या होणाऱ्या शोषणाच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी ओएसीस इंडिया या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून मुक्ती बाइक चॅलेंज रॅलीचे आयोजन करण्यात येते. रॅलीच्या निमित्ताने २००० किलोमीटरचा प्रवास करीत सुमारे ४००० हून अधिक शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, कार्यालये, खेडेगाव तसेच नागरिकांची वर्दळ असणा-या विविध ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्य आणि रॅलीतून, ‘शोषण थांबवा’, ‘बालमजुरी रोखा’, ‘लहान मुलांचा लैंगिक छळ थांबवा’, ‘बालविवाह थांबवा’ आदी संदेश देण्यात आले. ज्या भागांमध्ये जास्त प्रमाणात लहान मुलांची फसवणूक, बालविवाह, भीक मागायला लावणे, मानव तस्करीमध्ये जबरदस्तीने ढकलणे, अशा गोष्टी होतात, अशा भागांमधून रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे रॅलीचे मुख्य समन्वयक विश्वास उदगिरकर यांनी सांगितले. २७ आॅक्टोबर रोजी बंगळुरू येथील टाउन हॉल येथून या रॅलीस सुरु वात झाली. ती मैसूर-मंगळुरू-मुरु डेश्वर-धारवाड-सौंदत्ती-कोल्हापूर-मिरज-महाबळेश्वर-महाड, नवी मुंबई आणि ३ नोव्हेंबर रोजी मुंबई, असा प्रवास करण्यात आला. मुंबई सेंट्रल येथील सेंट अँथनी गर्ल्स स्कूल, नागपाडा येथे सांगता झाली. या रॅलीच्या सांगता सोहळ्यात ओएसीस इंडियाच्या कामाठीपुरा केंद्रातील विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई