शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अमेटी विद्यापीठाच्या विरोधात ग्रामस्थांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 02:47 IST

तीन तास ठिय्या : रोड बंद करण्याच्या कामाचा केला विरोध; सोमवारी बैठकीचे आयोजन

पनवेल : तालुक्यातील भाताण गावाशेजारी वसलेल्या अमेटी विद्यापीठाच्या विरोधात भाताण पाडा गावातील महिलांनी १७ मे रोजी आंदोलन पुकारले होते. ग्रामस्थांच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर विद्यापीठाच्या माध्यमातून लोखंडी गेट बसविण्यात येणार असल्याने महिलांनी आंदोलनचे हत्यार उपसले होते. अखेर माजी आमदार विवेक पाटील व पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन स्थगित करण्यात आले असून, सोमवार, २१ मे रोजी यावर तोडगा काढण्यात येणार आहे.ग्रामपंचायत भाताण हद्दीतील भाताण पाडा गावातील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अमेटी विद्यापीठाने जिल्हा परिषदेच्या रस्त्यावर गेट बसविण्यासाठी घेतलेले आहे. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. तेटगुरे यांना देण्यात आले होते. १७ मे रोजी अमेटी विद्यापीठाने पोलीस बंदोबस्तात लोखंडी गेट बसविण्यास सुरु वात केली. याला गावातील महिलांनी जोरदार विरोध केला.शेकडो महिला जवळपास ३ ते ४ तासांहून अधिक वेळ रणरणत्या उन्हात उभ्या राहून गेट बसविण्यास विरोध करत होत्या. या लोखंडी गेटमुळे गावातील नागरिकांचा येण्या-जाण्याचा रस्ता कायमचा बंद होणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या वेळी तालुका पोलीस ठाण्याचे व.पो.नि. मालोजी शिंदे, माजी आमदार विवेक पाटील, अमेटी विद्यापीठाचे उपाध्ये यांच्यात चर्चा झाली व सोमवारी यावर तोडगा काढण्याचे ठरले आहे. त्यामुळे महिलांचे आंदोलन मागे घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.या वेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. तेटगुरे, जिल्हा परिषद सदस्य राजू पाटील, पंचायत समितीचे सदस्य काशिनाथ पाटील, माजी सरपंच नंदकुमार मुकादम, अनंता मुकादम, मधुकर मुकादम, सदस्य केशव गायकर, जनार्दन घरत, महिला आघाडीच्या प्रिया मुकादम यांच्यासह शेकडो महिला व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :educationशैक्षणिक