आविष्कार देसाइ, अलिबागबहुचर्चित पेण अर्बन बँकेतील ७५८ कोटीच्या महाघोटाळ््याला २२ सप्टेंबरला पाच वर्षे होत आहेत. तपासाबाबत समाधानकारक प्रगती नसल्याने ठेवीदार चांगलेच हवालदील झाले आहेत. गणेश विसर्जनानंतर १५ हजार ज्येष्ठ नागरिक ठेवीदार रायगड जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या कार्यालयासमोर मुक्काम ठोकणार आहेत. याबाबतचे पत्र १९ सप्टेंबररोजी जिल्हा पोलिस अधिक्षकांना देण्यात आले आहे.संघर्ष समितीच्या या भुमिकेमुळे पेण अर्बन बँक महाघोटाळ््या विरोधातील आंदोलन तीव्र होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.पेण अर्बन बँकेमध्ये एक लाख ९३ हजार ठेवीदार, खातेदार आहेत. यांच्या घामाच्या ठेवींवर डल्ला मारणारे अद्याप मोकाटच आहेत. बेकायदा कर्ज वाटप करुन शेतकरी, कष्टकरी, कामगार अशा ठेवदारांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली. आरोपींना शासन करुन ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देण्याच्या वल्गना राजकारणी आणि पोलिसांनी वेळोवळी केल्या होत्या. मात्र तपासात काहीच प्रगती होत नव्हती. २० मार्च २०११ रोजी पेण संघर्ष समितीने बेमुदत उपोषण केल्यानंतर या महाघोटाळ््याच्या तपासाला काही प्रमाणात वेग आला. पेण अर्बन बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी, आॅडीटर्स यांच्या विरोधात २२ मार्च २०११ रोजी पेण पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. संर्घष समितीने दट्या दिल्यानंतरच तपास यंत्रणा तात्पुरती हालली होती.२२ सप्टेंबर २०१५ रोजी या महाघोटाळ््याला तब्बल पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या पाच वर्षात सर्वसामान्य ठेवीदार, ज्येष्ठ नागरिक हे आपल्या हक्काच्या पैशापासून अजूनही वंचित आहेत. एप्रिल २०१५ रोजी विशेष स्थापलेल्या तपास पथकाने आतापर्यंत किती जणांवर गुन्हे दाखल केले त्याचप्रमाणे महाघोटाळ््यात किती रक्कम वसूल झाली आहे. याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक सुवेझ हक यांनी घ्यावी, अशा मागणीचे पत्र पेण अर्बन बँक ठेवीदार संर्घष समितीने १९ सप्टेंबर २०१५च्या पत्रान्वये केली आहे.१२८ बोगस कर्ज खात्यांद्वारे ७५८ कोटी रुपयांची कशी पध्दशीरपणे लूट झाली आहे. याची सर्व कागदपत्रे, बोगस कर्ज खात्यांच्या २२ हजाराहून ंअधकि बँक एन्ट्रीज याची तपशिलवार माहिती तपास यंत्रणेला देण्यात आली आहे. अशी माहिती बँकेतर्फे देऊनही तपास यंत्रणा सुस्त आणि निषक्रीय का असा सवाल संघर्ष समितीने जिल्हा पोलिस अधिक्षक सुवेझ हक यांना केला आहे.128बोगस खात्यांपैकी किती खात्यांचा तपास झाला, किती बोगस खातेदारांवर प्रत्यक्ष कारवाई झाली, किती वसूल झाली, तपास पथक आणि विशेष तपास पथकाने केलेली कारवाई, त्यांना काही कालबध्द कार्यक्रम दिला आहे का, त्याचप्रमाणे तापस प्रकरणी येणारा खर्च पिडीत बँक म्हणजेच ठेवीदारांकडून वसूल करणे अपेक्षीत आहे का अशी माहिती मिनल खोपकर या महिलेने मागितली आहे.48 आरोपींवर दोषारोपपत्र सादर केले एवढीच माहिती देण्यात आली असून उर्वरीत माहिती तपास सुरु असल्याने देता येत नसल्याचे म्हटले आहे. तपास यंत्रणेतेच्या बोटचेपे धोरणा विरोधात आवाज उठविण्यासाठी पोलिस अधिक्षकांच्या दारात मुक्काम ठोकणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी लोकमतला दिली.विशेष तपास यंत्रणेला स्टेशनरीचा पुरवठाविशेष तपास यंत्रणेला सुमारे नऊ हजार रुपयांची स्टेशनरी देण्यात आली आहे. वाहन, चालक, संगणक, संगणक परिचालक यांचीही मागणी विशेष तपास पथकाने केली होती. मात्र ठेवीदारांच्याच पैशातून तपास करणार आहात का असा सवाल तपास यंत्रणेला केल्याचेही नरेन जाधव यांनी सांगतिले.
पेण अर्बनच्या ठेवीदारांचे आंदोलन
By admin | Updated: September 21, 2015 03:27 IST