शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पारगाव ग्रामस्थांचे आंदोलन; सिडकोकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 03:48 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रातील मौजे पारगाव-डुंगी येथील भूविकासाचे काम वाटपामध्ये केवळ डुंगी गावाचे नाव दर्शविले आहे. त्यामुळे पारगाव गावाचे रहिवासी म्हणून आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे.

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रातील मौजे पारगाव-डुंगी येथील भूविकासाचे काम वाटपामध्ये केवळ डुंगी गावाचे नाव दर्शविले आहे. त्यामुळे पारगाव गावाचे रहिवासी म्हणून आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे. ५० टक्के माती भरावाची कामे मिळाली पाहिजेत, यासाठी पारगाव येथील ग्रामस्थांनी भरावाची कामे थांबविण्याससाठी मंगळवारी आंदोलन केले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलन थांबवले. या वेळी ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.विमानतळ गाभा क्षेत्रातील सिडकोने निश्चित केलेल्या कामाच्या वाटपामध्ये केवळ डुंगी या गावाचे नाव दर्शवले आहे. डुंगी गावातील प्रकल्पबाधितांच्या चार सोसायट्यांना कामाच्या वर्कआॅर्डरदेखील दिलेल्या आहेत.वास्तविक या भूसंपादित झालेल्या जमिनींमध्ये पारगाव गावच्या प्रकल्पबाधितांच्या जमिनीचे प्रमाण जवळपास ९५ टक्केपेक्षा अधिक असताना आमच्या गावाच्या सोसायट्यांना या कामामध्ये घेतलेले नाही. ही गंभीर स्वरूपाची चूक असून सिडकोसोबत वेळोवेळी बैठका घेऊन देखील आजपर्यंत यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सिडको अन्याय करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी या वेळी केला.या कामांमुळे पारगावच्या सर्व बाजूंनी किमान ८ मीटर उंचीचा भराव होणार आहे. त्यामुळे गावाच्या पुनर्वसनाबाबत व नागरी सुविधांबाबत गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. याबाबत सिडको जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.तीन दिवसांत न्याय देण्याची मागणीशासन निर्णयाप्रमाणे ५० टक्के मातीच्या भरावाच्या कामाचा कायदेशीर हक्क मिळावा, अन्यथा येथील भूविकासाचे काम थांबवावे लागेल, असा इशारा पारगाव ग्रामस्थांनी दिला आहे.तीन दिवसांत ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.या आंदोलनात शेकडो महिला, पुरु ष आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल