शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नेने महाविद्यालयात आंदोलन

By admin | Updated: June 23, 2016 03:34 IST

पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर मनमानी कारभाराचा आरोप ठेवीत महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांनी सोमवारी

पेण : पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर मनमानी कारभाराचा आरोप ठेवीत महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांनी सोमवारी महाविद्यालयासमोर मुंबई विद्यापीठ टिचर्स युनियनच्या माध्यमातून धरणे आंदोलन करीत सतीश धारप यांना हटविण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे विद्यापीठ स्तरावरून होणारा पत्रव्यवहार, नॅकचे कामकाज करण्यास प्राध्यापकवर्गाची टाळाटाळ व विनाअनुदानित तुकड्या बंद करण्याचे विद्यापीठाचे आदेशाचे उल्लंघन मी करू शकत नाही. विद्यापीठ कायद्याच्या चौकटीत राहूनच मला काम करावे लागते, अशी धरणे आंदोलनाबाबत प्राचार्य धारप यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. त्यामुळे प्राचार्य विरुध्द प्राध्यापक असा संघर्ष नेने महाविद्यालयात उभा ठाकला आहे.पेणच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयात गतवर्षीपासून शास्त्र विभागाची वेळ दुपारी करण्यात आली असता यावर विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले होते. संस्था प्रमुखांनी त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याशी प्रत्यक्ष संवाद साधूनच सायन्स शाखेसंबंधात वेळेच्या वादावर पडदा टाकला होता. गतवर्षीचा ट्रेलरचा शो यावर्षी मात्र प्राध्यापक वर्गाने स्वत:कडे घेत थेट प्राचार्यांवरच आंदोलनाच्या माध्यमातून शरसंधान केले आहे. यामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयातील वेळेतील बदल करणे, प्राध्यापकांवर लॅपटॉप चोरीचे खोटे आळ घेणे, प्राध्यापकांना प्रांतीय क्षेत्रानुसार घाटी म्हणून संबोधने, प्राध्यापकांना कमी दर्जाची वागणूक देणे, महाविद्यालयातील कोणत्याही निर्णयामध्ये प्राध्यापकांना सहभागी न करणे, स्टाफरूममधील प्राध्यापकांचा चहा, वर्तमानपत्रे बंद करणे व दरवर्षी महाविद्यालयीन इमारतीची तोडफोड करून नवीन बांधकाम करणे यावर प्राध्यापक वर्गाने आक्षेप घेत प्राचार्य सतीश धारप हटावचा नारा देवून आंदोलन केले आहे.दुसरीकडे प्रा. धारप यांनी या सर्व मुद्यांना खोडीत, प्राध्यापकवर्ग नॅकच्या कामकाजात सहभाग न होणे, इमारत बांधकाम हा प्रमुख विषय आहे, त्यामुळे त्यावर मी काही बोलत नाही. महाविद्यालयात होणाऱ्या वर्षभराच्या शैक्षणिक उपक्रमात प्राध्यापकांचा सहभाग नसतो. विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयात भूगोल विषय सुरू करण्यास शासनाची परवानगी नाही. नॅकसंदर्भात महाविद्यालयाला कायमस्वरूपी इमारत, विद्यार्थ्यांसाठी कॉमन रुम यांची उपलब्धता असल्याशिवाय नॅकचे काम करता येणार नाही असे सांगितले. (वार्ताहर)