शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

घणसोली पामबीचसाठी हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 01:43 IST

खारफुटीमुळे मागील ९ वर्षांपासून रखडलेल्या घणसोली ते ऐरोली दरम्यानच्या पामबीच मार्गासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत

नवी मुंबई : खारफुटीमुळे मागील ९ वर्षांपासून रखडलेल्या घणसोली ते ऐरोली दरम्यानच्या पामबीच मार्गासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मंगळवारी खासदार राजन विचारे यांनी अर्धवट अवस्थेत पडून असलेल्या या मार्गाची पाहणी केली.सिडकोने २00९ मध्ये तीन-तीन लेनचा ३ किमी लांबीचा घणसोली-ऐरोली पामबीच मार्ग घणसोलीपर्यंत तयार केला. त्यापुढील टप्प्यात मोठ्याप्रमाणात खारफुटी असल्याने या मार्गाचे काम रखडले. पर्यावरण विभागाच्या परवानगीअभावी मागील ९ वर्षांपासून या मार्गाचे काम रखडले आहे. घणसोली नोड सिडकोकडून हस्तांतरित झाल्यानंतर महापालिकेने या रस्त्याच्या कामासाठी पुढाकार घेतला. या मार्गावर केबल स्टे ब्रिज बांधण्यासाठी महापालिकेने ८00 कोटीरुपयांचा आराखडा तयार केला. परंतु हा ब्रिज अत्यंत खर्चीक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रस्तावित पूल एलिव्हेटेड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी २५0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. असे असले तरी कांदळवनाचा अडथळा दूर होणे गरजेचे असल्याने खासदार राजन विचारे यांनी आता पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी त्यांनी कांदळवन विभागाचे आयुक्त वासुदेवन यांच्यासोबत या रस्त्याची पाहणी करून त्यांना त्याचे महत्त्व पटवून दिले. एलिव्हेटेड ब्रिज बांधल्यास शहराअंतर्गत असलेली वाहतूक या मार्गे वळवू शकतील व ठाणे - बेलापूर मार्गावरील ऐरोली रेल्वे ब्रिजखालील वाहतूककोंडीला आळा बसणार आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात वाहतूककोंडी कमी होईल असे कांदळवन आयुक्त वासुदेवन यांना पटवून दिले. वासुदेवन यांनी रखडलेल्या या मार्गाच्या कामाला परवानगी देण्याबाबत अनुकूलता दर्शविल्याचे राजन विचारे यांनी सांगितले. महापालिकेने तशा आशयाचा प्रस्ताव तयार करून सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेला घणसोली-ऐरोली पामबीच मार्ग दृष्टिपथात दिसू लागला आहे.महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, गटनेते द्वारकानाथ भोईर, नगरसेवक चेतन नाईक, राजू कांबळे, ममित चौगुले, जगदीश गवते, सुरेश सकपाळ तसेच एम. एस. बोटे, पंडित राव उपस्थित होते.