शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
3
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
4
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
5
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
7
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
8
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
9
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
10
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
11
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
12
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
13
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
14
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
15
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
16
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
17
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
18
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
19
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
20
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

मुलानेच चोरी केल्याचा आईला संशय

By admin | Updated: May 15, 2014 00:52 IST

एकाच दिवशी शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात घरफोडी-सोनसाखळी आणि वाहनचोरी अशाप्रकारचे सहा गुन्हे नोंद झाले आहे.

ठाणे : एकाच दिवशी शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात घरफोडी-सोनसाखळी आणि वाहनचोरी अशाप्रकारचे सहा गुन्हे नोंद झाले आहे. कळव्यातील खुर्शीदा सिद्दीकी यांचे घर बनावट चावीने उघडून घरातील १ लाख ८८ हजारांचे ९ तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. यात त्यांनी त्यांचा लहान मुलगा नदीमने चोरी केल्याचा संशय व्यक्त केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. दुसर्‍या घटनेत, वीर सावरकर मार्गावरील विश्वजीत सोसायटीतील विलास टिपनीस यांची पत्नी व मुलगा कामानिमित्त बाहेर गेले असताना चोरट्यांनी घर फोडून घरातील ३३ हजार ३०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. तिसर्‍या घटनेत, कळव्यातील अरुणा गोळे या ट्रव्हल्स बसने पोलादपूर ते कळवा असा प्रवास करताना बसच्या डिक्कीत ठेवलेल्या बॅगेतून ५० हजारांचे दोन तोळ्याचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी कळवा ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पाचव्या घटनेत, मुरबाडमधील वैशाली मोरे या ठाण्यात आल्या असताना त्यांच्या गळ्यातील २५ हजारांची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरीला गेल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. तसेच सहाव्या घटनेत, कौसा-मुंब्रा रफीक शेख यांनी उभी केलेली रिक्षा चोरीला गेल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.अनेक गस्ती पथके तयार करुन पोलिस या चोर्‍या रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, तरी चोर्‍या थांबण्याचे नाव घेत नाहीत. (प्रतिनिधी)