शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

आगीतून सत्तरहून अधिक जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:21 IST

डम्पिंग ग्राऊंडला लागली होती आग : अनधिकृत तबेल्यासाठी ग्राऊंड आंदण, प्रशासनाची डोळेझाक

सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेचे तुर्भे येथील डम्पिंग ग्राऊंड तबेले चालकांसाठी आंदण दिल्याची बाब समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्री त्याठिकाणी लागलेल्या आगीमुळे ही बाब प्रकाशात आली. यादरम्यान अग्निशमन दलाने तेथून वेळीच ७० हून अधिक जनावरांची सुटका केल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. मंगळवारी मध्यरात्रीच्यासुमारास डम्पिंग ग्राऊंडमध्ये मोठी आग लागली होती. कचऱ्यामुळे ही आग अधिकच पसरल्यामुळे ती विझविण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे पाच तास प्रयत्न करावे लागले. यादरम्यान वाशी व कोपर खैरणे अग्निशमन दलाने दाखवलेल्या कौशल्यामुळे बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास आग आटोक्यात आली. मध्यरात्री १२.३० च्या सुमारास आग लागली असता, काही वेळातच अग्निशमन दलाला त्याची माहिती मिळाली. त्यानुसार अग्निशमन जवान घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी डम्पिंग ग्राऊंडच्या आतील भागात एका बाजूला मोठा तबेला असून, त्यात ७० हून अधिक जनावरे अडकली असल्याची बाब अग्निशमन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यात काही लहान वासरांचा समावेश होता. आगीच्या झळा या जनावरांपर्यंत पोहोचत असल्याने त्यांची सुटकेसाठी धडपड सुरू होती. परंतु तबेला सर्व बाजूने बांबूने बंदिस्त असल्याने व जनावरे रस्सीने बांधलेली होती. त्यामुळे अग्निशमन जवानांनी तात्काळ या जनावरांचे दोर कापून त्यांची सुटका करून त्यांना डम्पिंगच्या बाहेर आणले. अन्यथा या सर्व जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता. या घटनेमुळे डम्पिंग ग्राऊंडमध्ये चालणारा अनधिकृत तबेला प्रकाशात आला आहे. अनेक महिन्यांपासून त्याठिकाणी हा तबेला चालवला जात होता, असे परिसरातील नागरिकांकडून समजले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची त्यास मूकसंमती होती, याची शक्यता नाकारता येत नाही. डम्पिंगला लागूनच मोठ्या प्रमाणात भंगाराचे गोडावून तयार झाले आहेत. त्यापासून भविष्यात मोठ्या आगीचा धोका असतानाही त्यांना कारवाईत अभय मिळत असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. 

थोडक्यात टळली मोठी दुर्घटनाडम्पिंग ग्राऊंडला लागलेलीच आग तब्बल पाच तास धुमसत होती. त्यावर वेळीच नियंत्रण मिळवले गेले नसते, तर काही अंतरावरील कंपन्यांनाही आगीचा धोका निर्माण झाला होता. परंतु डम्पिंग बाहेर आग जाणार नाही, याची खबरदारी घेत अग्निशमन दलाने नियोजनबद्धरित्या आगीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य धोका टळला. राजकीय वरदहस्त डम्पिंग ग्राऊंडमध्ये पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्याव्यतिरिक्त खासगी व्यक्तींना प्रवेश नसतानाही आतमध्ये तबेला कसा उभारला, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हा तबेला पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून एका राजकीय व्यक्तीमार्फत चालवला जात होता. त्यामुळे संबंधित सर्वांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात पालिका आयुक्तांशी संपर्क साधला असता तो झाला नाही. 

टॅग्स :fireआग