शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात नोकर भरती करणे बंद करा, आता हे चालणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांचा गुगल, मायक्रोसॉफ्टसह अमेरिकी कंपन्यांना इशारा
2
"इजा, बिजा झाला, तिजाची वेळ आणू नका"; अजितदादांनी माणिकराव कोकाटेंना दिला होता इशारा
3
'कलाकेंद्रातील महिला गोळीच्या आवाजाने बेशुद्ध'; दौंड गोळीबारप्रकरणी आरोपींवर मकोका लावण्याच्या अजित पवारांच्या सूचना
4
पाकिस्तानी पासपोर्टचा नंबर शेवटून चौथ्या नंबरवर; भारतासाठी आनंदाची बातमी
5
IND vs ENG : पंतच्या जागी इशान किशनला मिळू शकते संधी; या कारणांमुळे तो ठरतो प्रबळ दावेदार
6
“स्वागत, अभिनंदन करतो”; मोहन भागवत-मुस्लीम धर्मगुरू बैठकीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; उच्चांकी स्तरावरुन मोठ्या प्रमाणात घसरले दर, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमत
8
धक्कादायक! पत्नीने पतीची जीभ तोडून खाल्ली; रक्तही प्यायली, ऐकून पोलिसही चक्रावले...
9
सोळा सोमवारचे व्रत कठीण पण तेवढेच फलदायी, कधी करावी सुरुवात? वाचा व्रतविधी!
10
रात्रीच्या अंधारात विवाहित प्रेयसीला भेटायला आला प्रियकर, नेहमीच्या ठिकाणी पोचला अन् पाहतो तर...
11
'दिलबर जानी'चा कारनामा! १९ वर्षाचा तरुण महिला, तरुणींचे बनवायचा व्हिडीओ; 'बंगळुरू नाईट लाईफ'च्या नावाखाली...
12
IND vs ENG: दुष्काळात तेरावा महिना! दुखापतीमुळे ऋषभ पंत मालिकेतून बाहेर, ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांनो, Good News! ८वा वेतन आयोग कधी येणार? पगार किती वाढणार? जाणून घ्या सविस्तर!
14
Smriti Irani : फाटलेला टी-शर्ट अन् साइड रोल...; ज्योतिषाच्या 'त्या' भविष्याणीमुळे बदललं स्मृती इराणीचं आयुष्य
15
Post Office च्या MIS स्कीममध्ये २ लाख जमा केल्यास महिन्याला किती मिळेल व्याज; पटापट चेक करा
16
"हर्षल पाटीलला आम्ही काम दिलं नव्हतं, त्याने..."; कंत्राटदाराच्या मृत्यूवर अजित पवारांचे स्पष्टीकरण
17
गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! STची एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द
18
बँकांकडून १२ लाख कोटींचे कर्ज बुडीत, कर्जाची रक्कम बँकांना परत मिळण्याची शक्यता कमी
19
मराठमोळा धमाका! आयुष म्हात्रेने वैभव सूर्यवंशीला टाकलं मागे; ९ षटकार खेचत रचला मोठा विक्रम
20
संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्प कधी होणार? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तारीखच सांगितली

‘टेंबा’ला जानेवारी २०१६ चा मुहूर्त

By admin | Updated: October 1, 2015 01:42 IST

गेल्या दोन वर्षांपासून रुग्ण सेवेच्या बहुप्रतिक्षेत असलेले भार्इंदर पश्चिमेकडील पालिकेचे टेंबा रुग्णालय सुरु होण्यासाठी प्रशासनाने यंदा जानेवारी २०१६ चा मुहूर्त शोधला आहे.

भार्इंदर : गेल्या दोन वर्षांपासून रुग्ण सेवेच्या बहुप्रतिक्षेत असलेले भार्इंदर पश्चिमेकडील पालिकेचे टेंबा रुग्णालय सुरु होण्यासाठी प्रशासनाने यंदा जानेवारी २०१६ चा मुहूर्त शोधला आहे. शहरात २०० खाटांचे सर्वसाधारण रुग्णालय सुरु करण्यासाठी तत्कालिन पालिका आयुक्त सुदाम गायकवाड यांनी राज्य शासनाला लेखी ग्वाही दिल्याने मुंबई उच्च न्यायालयानेसुद्धा ते पालिकेनेच सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. २००९ मध्ये ४ मजली इमारत बांधण्याला त्यावेळच्या महासभेने मंजुरी दिल्यानंतर त्याचा ठेका किंजल कंस्ट्रक्शनला दिला. पुढे त्याचा खर्च सुमारे ५५ टक्यांनी वाढून तो आजमितीस सुमारे १५ कोटींवर गेला आहे. या रुग्णालयाचा पसारा चालविण्यास असमर्थ वाटू लागताच आॅगस्ट २०१२ मध्ये ते राज्य शासन अथवा धर्मदाय किंवा सामाजिक संस्थेकडे हस्तांतर करण्याचा ठराव त्यावेळच्या महासभेने मंजूर केला होता. त्याला मान्यता मिळावी यासाठी पालिकेने उच्च न्यायालयात दिवाणी अर्ज दाखल केला होता. परंतु, तो फेटाळून पालिकेलाच ते सुरु करण्याचे आदेश २०१४ मध्ये न्यायालयाने दिल्याने प्रशासनाने तसे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात टप्प्या-टप्प्याने रुग्णालय सुरु करण्याचे नमूद करुन मार्च २०१५ पर्यंत पहिल्या टप्प्यातील ५० खाटांचे रुग्णालय सुरु करण्याचे म्हटले होते. परंतु, त्याचा खर्च परवडणारा नसल्याने पालिकेने त्याच्या खर्चाला सुसह्य करण्यासाठी अशासकीय देणग्या स्वीकारण्याच्या ठरावाला महासभेकडून मंजुरी मिळविली. त्यानंतरही प्रशासनातील भोंगळ कारभाराचा फटका त्याला बसू लागल्यान ते लवकरात लवकर सुरु होण्यासाठी प्रशासनाने आयुक्तांच्या विशेष अधिकारात रुग्णालय अधिक्षकांची अलिकडेच नियुक्ती केली आहे. यामुळे ते वेळेत सुरु व्हावे, यासाठी सततच्या आढावा बैठकीत रुग्णसेवेसाठी अत्यावश्यक कामांचा निपटारा करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच त्यात रुग्णसेवा सुरु करण्यासाठी प्रशासनाने जानेवारी २०१६ चा मुहूर्त निश्चित केला आहे. याबाबत रुग्णालय अधिक्षक डॉ. आर. बी. कुळकर्णी यांनी सांगितले की, हे रुग्णालय जानेवारी २०१६ मध्ये टप्प्या-टप्प्यात सुरु करण्यात येणार असून ते पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात येत आहे.