शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा अधिकाऱ्यांची मक्तेदारी; मार्केट यार्डमध्ये एकाधिकारशाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 11:01 IST

राजकीय दबाव आणून बदली 

नामदेव मोरे

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरक्षा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रत्येक मार्केटमध्ये एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. अनेकांची १० ते २० वर्षे बदलीच झालेली नाही. बदलीचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. बदली केलीच तर राजकीय दबाव आणून ती थांबविली जात असल्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे.

सुरक्षा विभागाला शिस्त राहिलेली नसून, त्यामुळे बाजार समितीमध्ये अवैध गुटखा, अमली पदार्थांची विक्री व इतर गुन्हेगारांना आश्रय मिळू लागला आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठी सहकारी बाजारपेठ असलेल्या  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  पाच प्रमुख मार्केट, एक विस्तारित मार्केट, मध्यवर्ती सुविधागृह, शीतगृह, निर्यात भवन असे विविध प्रकल्प आहेत. मार्केट परिसराच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलिस स्टेशन आहे. याच परिसरात पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्तांचे कार्यालय आहे. 

राजकीय दबाव आणून बदली 

भाजीपाला, फळ, धान्य व इतर मार्केटमध्येही अनेकजण कायमस्वरूपी याच मार्केटमध्ये नियुक्ती झाल्याच्या आविर्भावामध्ये काम करत आहेत.सुरक्षा विभागामधील कर्मचाऱ्यांची बदली झाली की लगेच संबंधित कर्मचारी राजकीय दबाव आणून बदली थांबवत आहेत. आमदार, मंत्री व इतर वजनदार व्यक्तींचा फोन आला की बदली लगेच रद्द केली जात आहे. अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच शिफ्टमध्ये काम करत आहेत.

ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेमुळे निर्माण झालेले प्रश्न     पाचही मार्केटमध्ये गुटख्याची बिनधास्त विक्री    भाजीपाला व फळ मार्केटमध्ये छुप्या पद्धतीने गांजा विक्री    फळ व भाजी मार्केट परिसरामध्ये देहविक्री करणाऱ्यांचा वावर वाढू लागला आहे. भाजीपाला, फळ, मसाला मार्केटमध्ये विनापरवाना मुक्काम करणाऱ्या अनोंदीत कामगारांची संख्या वाढली. 

बाजार समितीच्या कामकाजामध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे. सुरक्षा विभागामधील कर्मचाऱ्यांच्याही लवकरच बदल्या करण्यात येणार  आहेत. बदलीच्या नियमांची अंमलबजावणी केली जाईल. - पी. एल. खंडागळे, सचिव बाजार समिती 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती