शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारी बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:49 IST

पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील सोमवारी बेपत्ता झालेल्या दोन मुलांपैकी एकाचा मृतदेह गाढी नदीमध्ये सापडला आहे. तर दुसºया मुलाचा शोध सुरू आहे. मात्र, या शोधमोहिमेच्या वेळी पनवेलमधील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा ढिम्म कारभार समोर आला आहे.

पनवेल : पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील सोमवारी बेपत्ता झालेल्या दोन मुलांपैकी एकाचा मृतदेह गाढी नदीमध्ये सापडला आहे. तर दुसºया मुलाचा शोध सुरू आहे. मात्र, या शोधमोहिमेच्या वेळी पनवेलमधील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा ढिम्म कारभार समोर आला आहे.गेल्या चार-पाच दिवसांपासून रायगड जिल्ह्यासह पनवेलमध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे. याशिवाय प्रशासनाकडूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, येथील आपत्ती व्यवस्थापनाला परिस्थितीचे फारसे गांभीर्य दिसत नाही. दरड कोसळणे किंवा इतर आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत तयारी केली जाते. सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यासोबतच आपत्ती उद्भवल्यास त्याचा मुकाबला कसा करावा, याची तयारी करून घेतली जाते; परंतु याबाबत फक्त कागदोपत्री देखावा करण्यात येतो. त्यामुळेच एखादी मोठी आपत्ती निर्माण झाल्यानंतर या विभागाच्या मर्यादा स्पष्ट होतात.अतिवृष्टी झाली, पूर आला, वीज पडली, भूकंप झाला, त्यातून नुकसान झाले. अशा वेळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असावी लागते. मात्र, पनवेलमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज नसल्याचे दिसत आहे. सुकापूर येथे राहणारे प्रथमेश नानाभाऊ पाटील (६) व मयांक अडसूळ (३.५ वर्षे) हे दोघे रविवारी खेळायला बाहेर गेले होते; पण बराच वेळ झाला तरी ते दोघे घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. ही दोन्ही मुले गणेशघाटावर खेळत असल्याचे रहिवाशांनी पाहिले होते. त्यामुळे सिडकोच्या अग्निशमन दलाची तीन पथके तसेच पनवेल महापालिका अग्निशमन दलाच्या दोन पथकांनी शोधकार्य सुरू केले.