शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग करणाऱ्या रेल्वेगार्डला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 03:23 IST

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्या प्रकरणी रेल्वेच्या गार्डला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे

नवी मुंबई : महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्या प्रकरणी रेल्वेच्या गार्डला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी घणसोली रेल्वेस्थानकात त्याने फलाटावरून चाललेल्या विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पळाला असता, वाशीतील मित्राच्या घरातून अटक करण्यात आली.ए. के. सिन्हा (४१) असे अटक करण्यात आलेल्या रेल्वेगार्डचे नाव आहे. त्याने आॅनड्युटी असताना मोटरमनच्या केबिनमधून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता. पीडित विद्यार्थिनी घणसोलीची राहणारी असून, पनवेल येथे महाविद्यालयात शिक्षण घेते. मंगळवारी दुपारी ठाणे लोकलने ती घरी येत होती. यादरम्यान संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घणसोली स्थानकात ती रेल्वेतून उतरून फलाटावर चालत होती. या वेळी त्याच लोकलच्या पाठच्या बाजूच्या मोटरमन केबिनमध्ये बसलेल्या गार्डने गुप्तांग दाखवून विनयभंग केल्याची पीडित विद्यार्थिनीची तक्रार होती. तिने घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी वाशी रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली होती.यापूर्वी रेल्वेमध्ये महिला प्रवाशांना लुटारू तसेच गर्दुल्यांपासून असुरक्षितता वाटत होती. अशातच आॅनड्युटी रेल्वे कर्मचारीच मुलींची छेड काढू लागल्याच्या या घटनेचा संताप व्यक्त होत आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासादरम्यान ए. के. सिन्हा (४१) असे गार्डचे नाव असल्याचे समोर आले; परंतु पोलीस आपला शोध घेत असल्याची चाहूल लागताच त्याने घरातून पळ काढला होता. अखेर वाशीतील एका मित्राच्या घरी तो लपलेला असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिसांना मिळाली होती. यानुसार त्या ठिकाणी छापा टाकून सिन्हा याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.